शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अमानुषपणा... पत्नीला फासावर लटकवलं आणि तिच्या कुटुंबाला मेसेज करून कळवलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 16:10 IST

राहुल याला दारूचे व्यसन होते़ त्यावर मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दारू सोडण्यासाठी कोमलच्या नातेवाईकांनी त्याला पनवेल येथील व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते....

पुणे : पतीने पत्नीला मारहाण करुन छताच्या पंख्याला फाशी देऊन तिचा खुन करण्याची घटना नऱ्हे  येथील मानाजीनगरमध्ये गुरुवारी सकाळी उघडकीस आली़ पतीने पत्नीच्या नातेवाईकांना मेसेज करुन ही माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़.   कोमल राहुल हंडाळ (वय २२) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़ सिंहगड रोड पोलीस तिचा पती राहुल राजेश हंडाळ (वय २३, रा़ अंकुश पॅलेस, कुटे मळा, मानाजीनगर, नऱ्हे) याचा शोध घेत आहेत़.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल ही एका खासगी रुग्णालयात साफसफाईचे काम करीत होती़ तिचे वडिल, भाऊ कर्वेनगरला राहतात़ राहुल हा पूर्वी वारजे येथे रहात असे़ त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याची आई मार्केटयार्ड येथे रहायला गेली़ कोमल आणि राहुल यांचा प्रेमविवाह होता. राहुल याला दारूचे व्यसन होते़ त्यावर मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत़ दारू सोडण्यासाठी कोमलच्या नातेवाईकांनी त्याला पनवेल येथील व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते़ तेथून तो काही दिवसांपूर्वीच परत आला होता़. 

 त्या दोघांमध्ये भांडण झाल्याने कोमल काही दिवसांपूर्वी माहेरी कर्वेनगरला गेली होती़ दोन दिवसांपूर्वी राहुलने आता आपली भांडणे होणार नाहीत, असे सांगून तिला माहेरहून घरी परत आणले होते़ गुरुवारी पहाटे यांच्यात पुन्हा भांडणे झाली़ त्यानंतर त्याने कोमलला मारहाण करुन तिला सिलिंगच्या पंख्याला अटकवून फाशी देऊन तिचा खुन केला़ त्यानंतर सकाळी सहा च्या सुमारास तो घरातून बाहेर पडला़ त्याने तिच्या नातेवाईकांना मेसेज केला़ तिने मला धोका दिला असा सांगून मी तिला फाशी देऊन खुन केला आहे़ असे मेसेजमध्ये त्याने म्हटले होते़.

कोमलच्या नातेवाईकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जाऊन याची माहिती दिली़ त्यानंतर ते पोलिसांबरोबर सकाळी पावणे बारा वाजता त्यांच्या घरी गेले़ कुलूप उघडून आत प्रवेश केल्यावर कोमलला खाली झोपविलेले दिसून येत होते़ तिच्या अंगावर ड्रेस होता़ त्यावर नवी साडी नेसविलेली होती़ त्याने कोमलला लिपस्टिक लावून गळ्यात मंगळसुत्र घातले होते़.  सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली़ राहुल हंडाळ याचा पोलीस शोध घेत आहेत़  किरकोळ कारणावरुन पतीने पत्नीला मारहाण करुन तिचा खुन केल्याची आणखी एक घटना धनकवडीतील चव्हाण पॅलेस येथे घडली़ एकाच दिवस पतीने पत्नीचा खुन केल्याच्या दोन घटनेने एकच खळबळ उडाली आहे़ 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाDhankawadiधनकवडी