पत्नीबरोबर प्रेमसंबंधाला विरोध केल्याने पतीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:09 IST2020-12-07T04:09:17+5:302020-12-07T04:09:17+5:30

पुणे : पत्नीबरोबरच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याने प्रियकर व त्याच्या मित्राने पतीला उलट्या काेयत्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी ...

Husband beaten for opposing love affair with wife | पत्नीबरोबर प्रेमसंबंधाला विरोध केल्याने पतीला मारहाण

पत्नीबरोबर प्रेमसंबंधाला विरोध केल्याने पतीला मारहाण

पुणे : पत्नीबरोबरच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याने प्रियकर व त्याच्या मित्राने पतीला उलट्या काेयत्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अनिल ऊर्फ शक्ती शिवचरण (वय २०, रा. बिबवेवाडी) आणि नितीन गोपीनाथ फुलारी (वय २०, रा. अप्पर बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार बाळु पवार (रा. काकडे वस्ती, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी आणि शिवचरण यांचे प्रेमसंबंध आहेत. त्याला फिर्यादी यांनी विरोध केला. त्या कारणावरुन शिवचरण याने शुक्रवारी रात्री अप्पर बिबवेवाडी येथे फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लोखंडी कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केली. बाळु याने फिर्यादी यांना पकडून नितीन याने हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.

Web Title: Husband beaten for opposing love affair with wife