पती-पत्नी अपघातात ठार
By Admin | Updated: May 27, 2014 07:12 IST2014-05-27T07:12:12+5:302014-05-27T07:12:12+5:30
शिरूरजवळील बोºहाडे मळ्याजवळ रविवारी (दि. २५) दुपारी दुचाकीला (एम.एच ४२ डी. १९९७) पाठीमागून भरधाव येणार्या मोटारीने (एम.एच. ११ एच. ४७९५) जोरदार धडक दिल्याने यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला

पती-पत्नी अपघातात ठार
पाटेठाण : शिरूरजवळील बोºहाडे मळ्याजवळ रविवारी (दि. २५) दुपारी दुचाकीला (एम.एच ४२ डी. १९९७) पाठीमागून भरधाव येणार्या मोटारीने (एम.एच. ११ एच. ४७९५) जोरदार धडक दिल्याने यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. मगरवाडी (ता. दौंड) येथील राजेंद्र वाबळे (वय ५०), मंदा वाबळे (वय ४५) असे या मृत दांपत्याचे नाव आहे. वाबळे दांपत्य हे शिरूर येथे रुग्णालयात आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान घरी परत येत असताना हा अपघात झाला. मंदा वाबळे या जागीच ठार झाल्या, तर त्यांचे पती राजेंद्र वाबळे यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी मोटारीचे चालक संजू धेंडे (रा. आंबेगाव बुद्रुक, जि. पुणे) याला अटक केली असल्याचे शिरूरचे सहायक पोलीस निरीक्षक एन. वाय. तडाके यांनी सांगितले. दौंड तालुक्यातील मगरवाडी येथील वाबळे दाम्पत्य अपाघतात टार झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)