शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात घरात घुसून पती - पत्नीला लुटले; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 14:53 IST

महिलेच्या अंगावरील एक तोळा वजणाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे

लोणी काळभोर : घरात वृद्ध पतीपत्नी दोघेच असताना संधी साधून पाच दरोडेखोरांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून पती पत्नीला लुटले आहे. महिलेच्या अंगावरील एक तोळा वजणाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी बेबी महादेव कांचन (वय ५५, पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पाच अज्ञात चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन यांच्या सुनबाई तिच्या माहेरी गेल्या होत्या. त्यादिवशी मुलगा संध्याकाळी जेवण करण्यासाठी हॉटेलवर गेला असल्याने बेबी कांचन व पती हे दोघे घरात होते. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारांस दोघांनी जेवण केले. त्यानंतर घराला कडी लावून ते टीव्ही पाहत होते. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारांस कोणीतरी दरवाजा ठोठावला. तर अचानक दरवाजात चोरटे येउन उभे राहीले होते. त्यांनी चाकूचा धाक दाखवून बेबी यांच्या गळ्यातील आणि कानातील सोनं लगेच काढून दे. नायतर जीव घेईन. अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन त्यांनी गळ्यातील मंगळसुत्र आणि कानातले काढुन दिले. तरी त्याने चाकू त्यांच्याकडे रोखून धरला. बेबी यांनी हिम्मत करून चोरट्याच्या हातातील चाकू दोन्ही हातांनी पकडुन थोपविण्याचा प्रयत्न केला. झटापटीत त्यांचे दोन्ही हाताचे बोटांना चाकू कापल्याने गंभीर दुखापत झाली त्यामधुन रक्त येऊ लागले. 

त्यांनी आरडाओरडा केला, त्यावेळी समोरच्या खोलीकडे पाहीले तर पति महादेव तुकाराम ( बळी ) कांचन यांच्या समोर दोनजण चाकूचा धाक दाखवुन  घरातील कपाटाच्या किल्ल्यांची मागणी करीत होते. त्यावेळी बाहेर घराचे खिडकीजवळ आणखी एक माणूस उभा होता. बाहेरच्या माणसाने चला रे म्हणल्याने घरातील चौघे चोरटे घराबाहेर निघून गेले. जखमी बेबी यांना उपचारासाठी ऊरूळी कांचन येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांच्या दोन्ही हाताला पंधरा टाके पडले आहेत. माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता त्यांना दरोडेखोरांनी स्वयंपाकघराचे खिडकीतून हात घालून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडता आला नाही. तेव्हा बाहेर पडलेल्या काठीच्या सहाय्याने दरवाज्याची कडी उघडली व घरामध्ये प्रवेश केला. व दरोडा टाकून निघून गेले आहेत. परिसरातील अन्य एका ठिकाणी या दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी