दारूधंद्यास विरोध केला म्हणून पती-पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST2021-06-03T04:09:03+5:302021-06-03T04:09:03+5:30

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव तर्फे महाळुंगे गावच्या हद्दीत पाटीलमळा येथे महेंद्र पोखरकर व अर्चना पोखरकर हे पती-पत्नी ...

Husband and wife beaten for opposing alcoholism | दारूधंद्यास विरोध केला म्हणून पती-पत्नीस मारहाण

दारूधंद्यास विरोध केला म्हणून पती-पत्नीस मारहाण

याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव तर्फे महाळुंगे गावच्या हद्दीत पाटीलमळा येथे महेंद्र पोखरकर व अर्चना पोखरकर हे पती-पत्नी गाडीवर जात असताना गजानन आबाजी पोखरकर, मनीषा गजानन पोखरकर, ओंकार शिवाजी पोखरकर, मालन शिवाजी पोखरकर (सर्व रा. पिंपळगाव तर्फे महाळुंगे, ता. आंबेगाव) यांनी गाडीला आडवे होऊन दारूधंद्यास विरोध करतो, या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली. ओंकार पोखरकर व मनीषा पोखरकर यांनी फिर्यादीचे पती यास हाताने व काठीने मारहाण केली. तक्रारदार सोडविण्यासाठी गेले असता गजानन पोखरकर यांनी तक्रारदारास दोन्ही पायाला धरून खाली पाडून अश्लील भाषेत शिवीगाळ केली व तक्रारदाराचे कपडे फाडून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. याप्रकरणी अर्चना महेंद्र पोखरकर यांनी मंचर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तपास पोलीस सहायक निरीक्षक अर्पणा जाधव करत आहे.

Web Title: Husband and wife beaten for opposing alcoholism