धनगर समाजाचे चक्री उपोषण
By Admin | Updated: July 23, 2014 23:19 IST2014-07-23T23:19:56+5:302014-07-23T23:19:56+5:30
आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुळशी तालुका धनगर समाजाच्या वतीने बुधवार (ता़ 23) पासून पौड येथे चक्री उपोषण सुरू करण्यात आले आह़े

धनगर समाजाचे चक्री उपोषण
पिरंगुट : धनगर समाजाला आरक्षण देऊन अनुसूचित जातीमध्ये समावेश व्हावा म्हणून बारामती येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुळशी तालुका धनगर समाजाच्या वतीने बुधवार (ता़ 23) पासून पौड येथे चक्री उपोषण सुरू करण्यात आले आह़े
पौड एसटी स्थानकापासून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आल़े त्यानंतर महादेव मरगळे, लक्ष्मण मरगळे, दत्ता झोरे, विजय बोडेकर, लिलाबाई मरगळे, ठुमाबाई वाल्हेकर आदी कार्यकर्ते उपोषणास बसल़े
साठ वर्षापासून सुरू असलेला हा आरक्षणाचा लढा वारंवार आश्वासने देऊनही टोलवाटोलव करणा:या राज्यकत्र्याना त्यांची जागा दाखवल्याशिवाय यशस्वी होणार नसल्याचे प्रतिपादन दत्तात्रय सुर्वे यांनी या वेळी केल़े मुळशी तालुका शिवसेना आणि आरपीआयच्या वतीने या आंदोलनास लेखी, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे पाठिंबा दिला़
राज्य कृती समितीचा पुढील आदेश येईर्पयत मुळशीतील चक्री उपोषण सुरूच राहणार असल्याचे भाऊ मरगळे यांनी या वेळी सांगितल़े. शिवसेना तालुका प्रमुख रविकांत धुमाळ, जिल्हा परिषद सदस्या शिल्पा ठोंबरे, आरपीआयचे अशोक कांबळे, आशा थोपटे, बाळासाहेब कुरपे, हनुमंत सुर्वे, उज्ज्वला मारणो, लक्ष्मण वाकणकर, रामदास मानकर आदी या वेळी उपस्थित होत़े (वार्ताहर)