शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Pune: शेकडो वर्षांचे चिंचेचे झाड पाडल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू, इंदापूर नगरपालिकेचा निष्काळजीपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:47 IST

पक्ष्यांचा मृत्यू व वृक्ष पाडण्याची कारवाई वादाचा व चर्चेचा विषय झालेली आहे...

- शैलेश काटे

इंदापूर (पुणे) : छ. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अभिन्न अंग असणारे चिंचेचे पुरातन झाड शुक्रवारी दुपारी इंदापूर नगरपरिषदेने जेसीबीच्या सहाय्याने पाडले. त्यावर रहिवास करणा-या चित्रबलाक पक्षी व वटवाघळांचा त्या कारवाईत मृत्यू झाला. पक्ष्यांचा मृत्यू व वृक्ष पाडण्याची कारवाई वादाचा व चर्चेचा विषय झालेली आहे.

मालोजीराजे यांच्या गढीवर चिंचेची महाकाय पुरातन वृक्ष आहेत. गढीच्या उत्तरेला साधारणतः दीडशे वर्षांहून अधिक वयाचे चिंचेचे झाड आहे. या सर्व झाडांवर चित्रबलाक या परदेशी पक्षाचा कित्येक शतकांपासूनचा रहिवास आहे. गढीच्या कडेला असणारे चिंचेचे एक झाड काल इंदापूर नगरपरिषदेने जेसीबीच्या सहाय्याने पाडले. त्या कारवाईत जेवढे पक्षी उडून गेले तेच वाचले. अन्य पक्षी, त्यांची घरटी, त्यातील अंडी व निद्रिस्त वटवाघळे झाडाच्या ओझ्याखाली चिरडून गतप्राण झाली. जखमी झालेले पक्षी जिवंतपणी नगरपरिषदेने कचरा डेपोच्या कच-यात मातीआड केले.

ही माहिती पक्षीप्रेमी नागरिक व नागरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व वनविभागाशी संलग्न असणा-या रेस्क्यू टीमला समजल्यानंतर त्यांनी रात्री येवून कचरा डेपो धुंडाळला. तेथे सापडलेल्या आठ चित्रबलाकांना त्यांची उपचारासाठी नेले. किरकोळ जखमी असणा-या दोन चित्रबलाकांवर प्रथमोपचार करुन वनविभागाने त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. तर मरण पावलेल्या आठ पक्षांना रीतसर मूठमाती दिली.

आपला हरवलेला आसरा शोधताना एकाकी चित्रबलाक

टॅग्स :IndapurइंदापूरPuneपुणे