शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

एकिकडे टॅंकरने पाणीपुरवठा तर दुसरीकडे शेकडाे लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 15:23 IST

पुण्यातील काही भागात पाणी टंचाईमुळे टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत असताना विश्रांतवाडीमध्ये रस्त्याच्या मधाेमध असलेल्या पाईपलाईन मधून पाण्याची गळती हाेत असून शेकडाे लिटर पाणी दरराेज वाया जात अाहे.

ठळक मुद्देपाणी गळतीमुळे शेकडाे लिटर पाणी दरराेज वायापाण्याच्या तळे झाल्याने दुचाकीचालक घसरुन पडण्याची शक्यता

पुणे : पुण्यात पाणी मुबलक प्रमाणात असल्याचे अाधी म्हंटले जात असे. परंतु पुण्याच्या कक्षा रुंदावत गेल्यामुळे पुण्यात पाण्याची टंचाई निर्माण हाेण्यास सुरुवात झाली. पुण्याच्या वाढत्या लाेकसंख्येमुळे पुण्याच्या पाणी साठ्यांवर त्याचा ताण पडत असल्याचे चित्र अाहे. पुण्यातील काही भागांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ अाली अाहे. असे असताना विश्रांतवाडी येथील रस्त्याच्या मधाेमध असलेल्या पाईपलाईन मधून राेज पाण्याची गळती हाेत असल्याने शेकडाे लिटर पाणी वाया जात अाहे.     पुण्यात अाता पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली अाहे. शहराच्या विविध भागात वेगवेगळ्या वेळेनुसार पाणी साेडण्यात येते. महापालिकेकडून वेळाेवेळी पाणी वाचविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येते. परंतु नागरिकांमध्ये जनजागृती करणारी महापालिका स्वतः जागृत हाेणार का असा प्रश्न अाता निर्माण झाला अाहे. कारण पुण्यातील विश्रांतवाडीतील साठे बिस्किट ते प्रतीकनगर येथील रस्त्याच्या मध्ये गेल्या काही वर्षांपासून पाण्याची गळती हाेत अाहे. या भागातून रस्त्याच्या खालून गेलेल्या पाईपलाईन मधून ही पाणी गळती हाेत अाहे. एखाद्या नैसर्गिक झऱ्याप्रमाणे येथून पाणी येत असते. त्यामुळे दरराेज शेकडाे लिटर पाणी येथे वाया जात असते. पाण्याचा फाेर्स अधिक नसला तरी येथील गळतीमुळे रस्त्याच्या मधाेमध पाण्याचे तळे तयार झाले अाहे. या ठिकाणावरुन वेगात वाहने जात असल्याने पाण्यातून घसरून दुचाकीचालक पडण्याची शक्यता अाहे. येथून जवळ असलेल्या धानाेरी व इतर भागातील काही ठिकाणी पाणी येत नसल्याने टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागताे. तसेच काही ठिकाणी रात्री 12 वाजता पाणी येत असते. त्यामुळे नागरिकांना उशीरापर्यंत जागून पाणी भरावे लागते असे असताना दुसरीकडे शेकडाे लिटर पाणी वाया जात असल्याने येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली अाहे. त्याचबराेबर लवकरात लवकर या ठिकाणची गळती राेखण्यात यावी अशी मागणीही अाता नागरिक करत अाहेत. 

टॅग्स :PuneपुणेVishrantwadiविश्रांतवाडीWaterपाणीnewsबातम्या