शहरवासीयांना थंडीने हुडहुडी

By Admin | Updated: December 19, 2014 01:54 IST2014-12-19T01:54:44+5:302014-12-19T01:54:44+5:30

वातावरणात बदल होऊन तापमानाचा पारा ११ डिग्री सेल्सिअल्सवर आला आहे. निच्चांकी तापमानामुळे शहरवासीयांना थंडीची हुडहुडी भरली

Hundihudi to the residents of the city | शहरवासीयांना थंडीने हुडहुडी

शहरवासीयांना थंडीने हुडहुडी

पिंपरी : वातावरणात बदल होऊन तापमानाचा पारा ११ डिग्री सेल्सिअल्सवर आला आहे. निच्चांकी तापमानामुळे शहरवासीयांना थंडीची हुडहुडी भरली असून, दिवसभर गारठ्याचे वातावरण जाणवू लागले आहे. शनिवारपासून सहाव्या दिवशीही थंडी कायम आहे.
शनिवारपासून हिवाळी वातावरणातील थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. तापमानाचा पारा खाली उतरला तसे या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी, डोकेदुखी, अंगदुखी, डोळ्यांच्या आजारामुळे नागरिक त्रस्त आहेत. या संसर्गजन्य आजाराच्या उपचारासाठी दवाखान्यांत गर्दी वाढली आहे. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे.
थंडीच्या काळात प्रदूषण आणि दमट वातावरणामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आजार टाळण्यासाठी आहार, पोशाख आणि उपचारांबाबत योग्य दक्षता घेण्याचे आवाहन डॉक्टर मंडळी करीत आहेत.
पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या काळात ऊबदार आणि गरम कपडे घालूनच बाहेर पडणे नागरिक पसंत करीत होते. शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वेटर आणि जर्कींग परिधान करूनच वावरताना दिसून येत आहेत. पुढील काही दिवस याच पद्धतीचे तापमान असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
हिवाळ्यातील वातावरण आरोग्यदायी मानले जात असल्याने या काळात सकाळी
उठून जॉगिंग, योगा, व्यायाम करण्यास प्राधान्य दिले जाते. एरवी कधीही व्यायाम न करणारेदेखील थंडीच्या काळात शुद्ध हवा घेण्यासाठी घराबाहेर पडत असतात. कडाक्याची थंडी पडल्याने जॉगिंग, योगा, व्यायाम यामध्येही खंड पडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hundihudi to the residents of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.