शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वेचणाऱ्या महिलेने घडविले माणुसकीचे दर्शन ;एक दिवसाच्या अर्भकाला मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:03 IST

कापडी स्कार्फमध्ये नवजात अर्भक गुंडाळून त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकलेले होते...

ठळक मुद्देविश्रांतवाडीतील घटना : कचऱ्याच्या डब्यात सापडले एक दिवसाचे नवजात स्त्री अर्भक

पुणे : कचऱ्याच्या डब्यात एक दिवसाचे नवजात अर्भक सापडल्याचा धक्कादायक प्रकार विश्रांतवाडीत बुधवारी सकाळी घडला. नवजात अर्भकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी येथील स्नेहगंध अपार्टमेंट या इमारतीतील सकाळी कचरा गोळा करणाऱ्या सफाईसेविका लक्ष्मी ढेंबरे यांना कचऱ्याच्या डब्यात हालचाल जाणवली. एका कापडी स्कार्फमध्ये नवजात अर्भक गुंडाळून त्याला कचऱ्याच्या डब्यात टाकलेले होते. त्यांनी ते अर्भक बाहेर काढून पाहिले. तात्काळ त्यांनी इतर महिला कर्मचाऱ्यासोबत ही माहिती महापालिका आरोग्य निरीक्षक यांना दिली. आळंदी रोड चौकीतील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ हे स्त्री जातीचे नवजात अर्भक ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आज या घटनेमुळे पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासला आहे.एक दिवसाच्या नवजात जिवंत अर्भकाला कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचे दुष्कृत्य आज सकाळी उघडकीस आले. पण नशीब बलवत्तर म्हणून या नवजात अर्भकाला जीवदान मिळाले. पण एका कचरा वेचणाऱ्या महिला स्वच्छता सेविकेने मात्र माणुसकीचे दर्शन घडवित त्या अर्भकाला पोलिसांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी ससून रूग्णालयात पाठवले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWomenमहिलाPoliceपोलिस