मानव कल्याण हाच सर्वात मोठा धर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:16+5:302020-11-28T04:06:16+5:30

लोकमत न्यून नेटवर्क पुणे: भारताने संपूर्ण जगाला योग आणि अध्यात्माची नवी दृष्टी दिली. तसेच भौतिक शांती ही क्षणिक असून ...

Human welfare is the greatest religion | मानव कल्याण हाच सर्वात मोठा धर्म

मानव कल्याण हाच सर्वात मोठा धर्म

लोकमत न्यून नेटवर्क

पुणे: भारताने संपूर्ण जगाला योग आणि अध्यात्माची नवी दृष्टी दिली. तसेच भौतिक शांती ही क्षणिक असून आध्यात्मिक शांती हीच मानवाला सुखी बनविते. मानव कल्याण हाच सर्वात मोठा धर्म असून प्रत्येकाने सेवाभाव ठेवून गरीब आणि पीडितांची सेवा करावी, असे प्रतिपादन केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्यावतीने आणि युनेस्को अध्यासनांतर्गत आयोजित संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या ऑनलाईन उदघाटन प्रसंगी साध्वी निरंजन ज्योती बोलत होत्या.

ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांनी मानव कल्याणासाठी दिलेला संदेश आत्मसात करून वाटचाल करावी, असे डॉ. विजय भटकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Human welfare is the greatest religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.