शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाषाण टेकडीच्या बचावासाठी विश्वसुंदरी युक्ता मुखीसह नागरिकांची मानवी साखळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 14:44 IST

पाषाण टेकडी बचाव समिती यांच्यावतीने पाषाण टेकडीवर होत असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम त्वरित थांबवावे व झालेले काम काढण्यात यावे. व पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवण्यासाठी पाषाण टेकडीवर मानवी साखळी करून सहय़ांची मोहीम घेण्यात आली. 

पाषाण : पाषाण टेकडी बचाव समिती यांच्यावतीने पाषाण टेकडीवर होत असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम त्वरित थांबवावे व झालेले काम काढण्यात यावे. व पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवण्यासाठी पाषाण टेकडीवर मानवी साखळी करून सहय़ांची मोहीम घेण्यात आली. 

यावेळी खासदार वंदना चव्हाण,  विश्वसुंदरी युक्ता मुखी ,नगरसेवक अमोल बालवडकर , धर्मराज पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष शाम देशपांडे  पुष्कर कुलकर्णी, दीपक  श्रोते,  रवींद्र सिन्हा, शशांक देशपांडे, वैशाली पाटकर , गणेश कलापुरे, शैलेंद्र पटेल, डॉ. अनुपम सराफ, डॉक्टर कुसुम चंद्रकांत गारुडकर आदी उपस्थित होते.यावेळी नगरसेवक अमोल रतन बालवडकर  यांनी भेट देऊन सह्याची मोहिम ( आंदोलन ) करणाऱ्या पर्यावरण प्रेमी व पाषाण सुस टेकडी बचाव समिती याच्यांशी चर्चा केली.  यापुढे टेकडीवर काँक्रीटीकरण व बांधकाम होणार नाही असे आश्वासन दिले. पर्यावरण प्रेमी यांचे समाधान झाल्याने पर्यावरण प्रेमी यांनी टेकडीवर मानवी साखळी करून सह्याची मोहिम आंदोलन  स्थगित केले. सह्यांच्या मोहिमे अंतर्गत करण्यात आलेल्या सह्या चे निवेदन पुणे मनपा यांना देणार आहेत.

सदर आंदोलनात   सुमारे ८०० नागरिकांनी सह्या करून टेकडीवरील  पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवला व मानवी साखळीत सहभाग घेतला.  वसुंधरा अभियानचे , भुजल अभियान , एरिया सभा असोसिएशन ऑफ पुणे , जलदेवता सेवा अभियान, डेक्कन मोहल्ला कमिटी आदी विविध संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .शाम देशपांडे म्हणाले,  पुणे शहरातील टेकड्या वाचवल्या गेल्या पाहिजेत सुविधांच्या नावाखाली सुशोभिकरणाच्या नावाखाली चांगल्या हेतूने जरी काम झाले तरी ते योग्य नाही. पालिकेने केलेले काँक्रिटचे काम पालिकेने त्वरित काढले पाहिजे .

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या,  टेकडी वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांची एक समिती असली पाहिजे. टेकडी वाचवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. नागरिकांची टेकड्या वाचवण्यासाठीची सतर्कता महत्त्वाची आहे .दरम्यान नवचैतन्य हास्ययोग परिवारातील ज्येष्ठ नागरिकांनी पर्यावरणपूरक रस्ता ज्येष्ठ नागरिकांना येण्या जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या शेडपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली होती असे सांगितले .

टॅग्स :PuneपुणेenvironmentवातावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका