खंडपीठ व रुपी बँकेसाठी मानवी साखळी
By Admin | Updated: October 12, 2015 01:13 IST2015-10-12T01:13:58+5:302015-10-12T01:13:58+5:30
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे तसेच रुपी बँकेच्या खातेदारांचे पैसे त्वरित देऊन दोषी संचालकांवर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी रविवारी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती

खंडपीठ व रुपी बँकेसाठी मानवी साखळी
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे तसेच रुपी बँकेच्या खातेदारांचे पैसे त्वरित देऊन दोषी संचालकांवर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी रविवारी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती, पुणे जिल्हा बार असोसिएशन व रुपी बँकेचे खातेदार यांच्या वतीने हुतात्मा चौकात मानवी साखळी करण्यात आली.
खंडपीठ कृती समिती व रुपी बँकेच्या खातेदारांमार्फत दोन्ही मागण्यांसाठी मागील महिन्यापासून एकत्रितपणे लढा उभारण्यात आला आहे. या दोन्ही मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी एकत्रितपणे आंदोलन केले जात आहे. रविवारी सकाळी हुतात्मा चौकातही आंदोलन करण्यात आले. यामध्ये वकील, खातेदार, विद्यार्थी, प्राध्यापक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेळी खंडपीठाची मागणी कृती समितीचे मिहीर थत्ते, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अॅड. योगेश पवार, अॅड. हेरंब गानू, सचिव राहुल झेंडे, अॅड. सुहास फराडे, खजिनदार अॅड. साधना बोरकर तसेच असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. मिलिंद पवार, अॅड. औदुंबर खुनेपाटील, अॅड. राजेंद्र उमाप, अॅड. श्रीकांत अगस्ते, अॅड. मोहन वाडेकर, अॅड. गिरीश शिंदे, अॅड. सतीश पहिलवान यांच्यासह ज्येष्ठ वकील व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)