एकवीसशे वर्षांपूर्वी मानव वस्ती
By Admin | Updated: March 23, 2015 00:55 IST2015-03-23T00:55:06+5:302015-03-23T00:55:06+5:30
सिंहगड घेरा परिसरातील विस्तीर्ण अशा दऱ्याखोऱ्यात साधारण एकवीसशे वर्षांपूर्वीही मानववस्ती असल्याचे पुरावे आढळून आले आहेत.

एकवीसशे वर्षांपूर्वी मानव वस्ती
खडकवासला : सिंहगड घेरा परिसरातील विस्तीर्ण अशा दऱ्याखोऱ्यात साधारण एकवीसशे वर्षांपूर्वीही मानववस्ती असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. सातवाहन काळातील अर्धवट खोदलेल्या एका लेणीचा शोध लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
कॉलेजच्या इतिहास अभ्यासकांकडून किल्ले सिंहगड व या परिसरातील संदर्भ, येथील जुनी इतिहासकालीन ठिकाणे, गड परिसराची रचना, त्याचे अवशेष व त्या संदर्भात अभ्यास केला जात आहे.
इतिहास अभ्यासक नंदकिशोर मते हे डेक्कन विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिंहगड व परिसराचा पुरातन अभ्यास’ या विषयावरस संशोधनात्मक प्रबंध करत आहेत.
कोंढाणा किल्ल्याचा प्राचीन अभ्यास करत असताना या ठिकाणी सिंहगडावरील कोंढाणा मंदिराच्या बांधकामाची रचना ही यादवकालीन असल्याचे दिसून येत आहे.
मात्र मते यांच्या एका पाहणीत १३०० वर्षांपूर्वी म्हणजेच साधारण २१०० वर्षांपूर्वीही या परिसरात मानव वस्ती होती असे आढळून आले आहे. किल्ले सिंहगडाचे घेरा परिसरात अतिशय दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या दुर्गम दऱ्यात तत्कालीन सांबर मेटाच्या (सांबरेवाडी) वरच्या बाजूला व पूर्वीच्या खाडेमेटाच्या उंचच उंच तटामध्ये (कड्यात) जुन्या काळातील दस्तांमध्ये या ठिकाणाची चौराहा म्हणून नोंद आढळून येते.
सध्या घेरा सिंहगड परिसराबाबत सन १३०० पर्यंतच्या कालखंडातील लेख संदर्भ आढळतात. एका ग्रंथात (लेखात) त्या काळी म्हणजे सन १३२८ मध्ये महंम्मद तुघलक व नागनाथ कोळी या दोघांत पूर्वीच्या कुंदियानावर म्हणजेच कोंढाणा (सिंहगड) वर युद्ध झाले होते.
(वार्ताहर)
४डेक्कन कॉलेजचे प्राचीन शिलालेख व नाणी अभ्यासक डॉ. अभिजित दांडेकर यांनी या संदर्भात सांगितले, की सिंहगडाच्या उत्तरेला छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधिस्थळाच्या खालच्या बाजूला असलेल्या कड्याच्या उत्तर दिशेला असलेल्या एका कातळ डोंगराच्या रांगेतील या कोरलेल्या लेणीत ‘स’ हे अर्धवट नाव कोरलेले आहे. अशा पद्धतीने लेख कोरण्याचा काळ हा इ.स.पूर्व म्हणजे पहिल्या शतकातील सातवाहन काळातील आहे.
४लेणी अभ्यास डॉ. श्रीकांत गणवीर यांनी सांगीतले की, घेरा परिसरात खोदलेल्या या लेण्यात व येथील खडकात ठिसुळपणा आढळुन येत असुन कदाचीत त्या काळी हे काम अर्धवट राहण्याचे कारण म्हणजे राजाश्रय मिळाला नसावा किंवा निधीची कमरता जाणवली असावी.
४डॉ. श्रीकांत प्रधान सांगीतले की सिंहगड घे-यातील लेणी कोरण्याची पद्धत पहाता हे लेणे म्हणजे राहायला सुरक्षित ठिकाण येथे बसण्यासाठी बाक, दोन शयनगृह (खोल्या), पिण्याचे पाण्यासाठी टाके अशा पद्धतीचे आहे. सातवाह काळातील लेण्यांशी जुळणारे हे लेण्याचे खोदकाम असुन छन्नी सारख्या साधनाचा वापर यात केला गेल्याने हे मानवनिर्मीत खोदकाम आहे याचाच अर्थ येथे मानववस्ती असली पाहिजे असाही होतो.