शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सुहाना - प्रवीण मसालेवाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:09 IST

वृद्धापकाळाने पुण्यात निधन...

पुणे : ‘सुहाना - प्रवीण मसालेवाले’ या उद्योग समुहाचे संस्थापक संचालक हुकमीचंद (भाऊ) सुखलालजी चोरडिया (वय ९३) यांचे आज शुक्रवारी (३ जून) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. हुकमीचंद यांच्या पश्चात पुत्र राजकुमार, डॉ. प्रवीण, प्रदीप, धन्यकुमार, तसेच नातू विशाल आणि आनंद यांच्यासह मोठा परिवार आहे.

मसाले आणि लोणची या उद्योगात हुकमीचंद यांचे नाव मोठे होते. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९३० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला होता. कमलबाई यांच्यासोबत लग्नानंतर काही काळ ते सोलापूर जिल्ह्यातही वास्तव्याला होते. तेथे त्यांनी ‘आनंद मसाला’ हा घरगुती मसाले तयार करुन विक्री करण्याचा उद्योग केला होता. पुढे पुण्यात हडपसर परिसरात नोकरी करत असतानाच संध्याकाळी घरोघरी फिरुन मसाले विक्रीला सुरुवात केली होती.

मिरची बियाणे विक्री करता करताच हुकमीचंद यांना मसाला तयार करण्याची कल्पना सुचली होती. त्यामुळे ‘गरम मसाला’ आणि सोबतच ‘कांदा-लसूण मसाला’ तयार करुन घरोघरी विक्रीला त्यांनी सुरुवात केली. १९६० मध्ये त्यांनी ‘प्रवीण मसाले’ या नावाने त्यांनी व्यवसाय सुरु केला. पहिली दहा वर्षे अत्यंत कष्ट करुन पुढे हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथेच त्यांनी मोठी जागा घेऊन १९७२ मध्ये या व्यवसायाचा विस्तार केला.

१९७६ मध्ये सुमारे ५०० किलो लोणचे तयार करुन त्यांनी बाजारात ‘प्रवीण’ ची उत्पादने विक्रीसाठी आणली. त्या व्यवसायाचा विस्तार आता चौथी पिढी करत आहे. भारतभर जवळपास १० कारखाने आणि विक्री केंद्रे उभी करण्यात महत्वाचे मार्गदर्शन हुकमीचंद यांनी केले होते. ‘प्रवीण’ सोबतच ‘सुहाना’ आणि ‘अंबारी’ हे ब्रँड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत.

व्यवसाय करताना अत्यंत आधुनिकता आणि व्यक्तीगत जीवनात अत्यंत साधेपणा जपणे हे हुकमीचंद यांचे वैशिष्ट्य होते. सेंद्रीय शेती हा त्यांचा विशेष आवडीचा विषय होता. शिवाय, व्यापारी पेठांमध्ये ‘कैरी आणि मिरची’ या उत्पादनांमध्ये हुकमीचंद यांचा शब्द प्रमाण मानला जाई. मागील जवळपास २० वर्षे ते प्रत्यक्ष व्यवसायात सक्रीय नव्हते. मात्र, रॉ मटेरियलची निवड करणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसाठी कल्पना सुचवणे, अशा पद्धतीने चोरडिया कुटुंबासह नातेवाईकांच्याही उद्योगांना ते मार्गदर्शन करत असत.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड