शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग, सर्वकाही जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 09:38 IST

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी मेमाणे यांनी सांगितले की, बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणार्‍या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे २५ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे.

ठळक मुद्देअग्निशमन दलाला रात्री ११ वाजून ३४ मिनिटांनी या आगीची खबर मिळाली. आग इतकी भीषण होती की, त्यात पत्र्याच्या शेडला लावलेले लोखंडी अँगलही वाकले. त्यामुळे आत जाणे धोकादायक बनले होते. पत्रे अस्तावस्त पडल्याने आगीपर्यंत पाणी पोहचत नव्हते.

पुणे : बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सुमारे २५ हजार स्क्वेअर फुट असलेले हे पत्र्याचे संपूर्ण गोदाम या आगीमुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे. गोदामाचा लोखंडी सांगाड्याचे चॅनेलही वाकले इतकी भीषण ही आग होती. आगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाले. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए व एमआयडीसी येथील एकूण १२ फायरगाड्या व वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझविण्यात यश आले. आग लागताच गोदामातील सर्व जण बाहेर आल्याने कोणीही जखमी झाले नाही. 

याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी मेमाणे यांनी सांगितले की, बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणार्‍या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे २५ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे. हे गोदाम संपूर्णपणे पत्र्यांचे शेड असून त्याला सुमारे १२ ते १३ शटर होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता या गोदामाला आग लागली. गोदामाला लागूनच मालाची वाहतूक करणारी वाहने व दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांनाही या आगीची झळ बसून ती वाहने पेटवून खाक झाली.

अग्निशमन दलाला रात्री ११ वाजून ३४ मिनिटांनी या आगीची खबर मिळाली. आग इतकी भीषण होती की, त्यात पत्र्याच्या शेडला लावलेले लोखंडी अँगलही वाकले. त्यामुळे आत जाणे धोकादायक बनले होते. पत्रे अस्तावस्त पडल्याने आगीपर्यंत पाणी पोहचत नव्हते. तेव्हा गावातील २ जेसीबीच्या सहाय्याने पत्रे बाजूला करुन ही आग विझविण्यात आली. फायरगाड्यांमधील पाणी संपल्याने पाषाण येथून गाड्या पाणी भरून पुन्हा आणण्यात आल्या होत्या. 

तिजोरीतील ८ लाख वाचविले

आग विझवित असतानाच तेथील व्यवस्थापकाने आत तिजोरी असून त्यात मोठ्या प्रमाणावर पैसे असल्याचे सांगितले. तेव्हा अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी यांनी आत प्रवेश करुन ती तिजोरी बाहेर आणली. त्यातील ८ लाख रुपये वाचविण्यात यश आले. मात्र, तिजोरी जवळील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सुमारे २ लाख रुपये जळून खाक झाले. सुमारे ३ तास ही आग धगधगत होती. 

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल