वाघोली हद्दीतील प्लास्टिक गोदामाला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:14 IST2021-08-15T04:14:56+5:302021-08-15T04:14:56+5:30

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार: आगीमध्ये प्लास्टिकचा माल जळून खाक झाला असून, अग्निशमन दलाने ५ तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण ...

A huge fire broke out at a plastic warehouse in Wagholi area | वाघोली हद्दीतील प्लास्टिक गोदामाला भीषण आग

वाघोली हद्दीतील प्लास्टिक गोदामाला भीषण आग

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार: आगीमध्ये प्लास्टिकचा माल जळून खाक झाला असून, अग्निशमन दलाने ५ तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविण्यासाठी पीएमआरडीए अग्निशमनच्या दोन, तर पुणे महापालिकेची एक अशा तीन गाड्या दाखल झाल्या होत्या. आगीचे कारण अद्याप कळाले नसून अग्निशमन दलाच्या व लोणीकंद पोलिसांच्या मदतीने ही आग विझविण्यात यश आले. मात्र, गोडाऊनमधील लाखो रुपयांचे प्लास्टिक जळून खाक झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी विजय महाजन, संदीप शेळके, नितीन माने, प्रशांत अडसूळ, संदीप तांबे, अक्षय नेवसे, अक्षय बागल, मयूर गोसावी, तेजस डांगरे, ओम पाटील, महेश पाटील, उमेश फाळके यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले.

--

फोटो १४ वाघोली प्लास्टिक गोदाम आग

फोटो ओळी : वाघोली येथील प्लास्टिकच्या गोदामाला लागलेली आग.

Web Title: A huge fire broke out at a plastic warehouse in Wagholi area