शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Pune| गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटामुळे संसारे पडली उघड्यावर; पाच झोपड्यांची राखरांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:15 IST

सिलेंडरचा काही भाग वाऱ्याच्या वेगाने उडून ९०० फुट अंतरावर जाऊन पडला होता...

अवसरी (पुणे) : इंदोरेवाडी भोरवाडी- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे गॅस सिलेंडरच्या झालेल्या भीषण स्फोटात ठाकर समाजाच्या पाच झोपड्याची राखरांगोळी  झाली. संसारउपयोगी वस्तू जळून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडली आहेत. गुरुवारी (दि.१७) ही  घटना घडली. सुदैवाने कुटुंबातील लोक धामणी येथे खंडोबाच्या दर्शनाला गेले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शिंदेमळा येथील पोलीस पाटील दत्ता शिंदे यांनी दिली.

आगीमध्ये कोंबड्या, किराणामाल, धान्याची पोती, शेंगांची पोती, कपडे, सोन्याचांदीचे  दागिने, भांडी, इलेक्ट्रिक वस्तू, शेती अवजारे जळून गेली आहेत. सिलेंडरचा काही भाग वाऱ्याच्या वेगाने उडून ९०० फुट अंतरावर जाऊन पडला होता. ही घटना कळल्यानंतर पोलीस पाटील दत्ता शिंदे, अनिल शिंदे,शंकर बांगर ग्रामस्थ मदतीसाठी तेथे गेले पण तोपर्यंत जळून खाक झाले होते. नवनाथ वामन केदारी, सचिन वामन केदारी, भाऊसाहेब भगवान केदारी, प्रकाश संजय मधे, राहुल भाऊसाहेब केदारी यांच्या झोपड्या जळाल्या आहेत.

कामगार तलाठी शशांक चौदंते, ग्रामसेवक जे. डी शिदोरे, अवसरी खुर्दचे पोलीस पाटील संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढोणे यांनी भेट  देऊन पंचनामा केला. पोलीस पाटील दत्ता शिंदे यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आगीचे कारण समजले नाही. कळंब येथील साक्षी एच.पी गॅस एजन्सीचे मालक बाळाशिराम भालेराव यांनी घटनास्थळी भेट दिली. या कुटुंबाना योग्य मदत करू, असे त्यांनी सांगितले.     

टॅग्स :PuneपुणेambegaonआंबेगावCylinderगॅस सिलेंडर