बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी टक्केवारीची अट सिथील
By Admin | Updated: June 6, 2014 22:37 IST2014-06-06T21:44:15+5:302014-06-06T22:37:36+5:30
महापालिकेच्या शाळेत शिकणा-या बारावीच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के गुणांसाठी ५१ हजार रुपये बक्षिस देण्याची योजना आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी टक्केवारीची अट सिथील
- स्थायी समितीपुढे महिला बालकल्याणचा प्रस्ताव
पुणे : महापालिकेच्या शाळेत शिकणा-या बारावीच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के गुणांसाठी ५१ हजार रुपये बक्षिस देण्याची योजना आहे. मात्र, गेल्या वर्षी एकही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८५ ऐवजी ८० टक्केपर्यंत अट सिथील करण्याचा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीने स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
महापालिकेच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळाल्यास त्यांना शारदाबाई पवार शिष्यवृत्ती योजने अंतर्गत प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, गेल्या वर्षी दहावीच्या ४५ विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला. परंतु, बारावीच्या एकाही विद्यार्थ्याला लाभ मिळाला नाही. शिवाय महापालिकेच्या २०१४-१५ अर्थसंकल्पात त्यासाठी २१ लाख २५ हजार रुपयांची तरतूद केली आहे.
महापालिकेच्या बारावी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अंतर्गत ५१ हजार रुपयांच्या बक्षीस योजनेचा लाभ मिळावा. यासाठी नगरसेवक संजय भोसले व सचिन भगत यांनी महिला बालकल्याण समितीला बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८० टक्केपर्यंत अट सिथील करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर महिला बालकल्याण समिती व प्रशासनानेही अनुकूल अभिप्राय दिला आहे. त्यानुसार स्थायी समितीपुढे टक्केवारीची अट शिथील करण्याचा प्रस्ताव आला आहे.