शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

HSC Exam : बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर सकाळी साडेनऊलाच हजर व्हावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 10:19 IST

सकाळी साडेनऊ वाजता विद्यार्थ्यांना यावं लागणार केंद्रावर...

पुणेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षांसाठी (HSC Exam 2022) विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी साडेनऊ वाजता थर्मल स्कॅनिंगसाठी (thermal scanning) हजर राहावे लागणार आहे. परिणामी नाष्टा करून विद्यार्थ्यांना घराबाहेर सकाळी लवकर पडावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आले आहे.

भाषा विषयाच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना सकाळी ९.३० ते दुपारी २ या कालावधीत वर्गात उपस्थित रहावे लागणार आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करतात. तसेच जेवनाच्या वेळा बदलतात. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आहारात बदल होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले म्हणाले, विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत पुरेशी विश्रांती घ्यावी. अभ्यासाचा ताण घेऊन जागरण करू नये. तसेच नेहमीच्या सवईचा आहार घ्यावा, आहारात बदल झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे नाष्टा करूनच विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडावे. भाषा विषयाच्या पेपरसाठी मोठा कालावधी देण्यात आला आहे. उर्वरित विषयाचा पेपर भाषा विषयाच्या पेपर पेक्षा सव्वातास आधी सुटणार आहे.

परीक्षा कालावधीत पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा त्यांच्याच शैक्षणिक संस्थेत देण्याची संधी दिली आहे. कोरोनामुळे थर्मल स्कॅनिंग केले जाणार असेल तर विद्यार्थ्यांनी व पालकांनी याबाबत सहकार्य करणे गरजेचे आहे.

- दिलीप विश्वकर्मा, पालक, महापॅरेंट्स असोसिएशन

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्र