प.पू. प्रतिभाजी म.सा. यांचा चातुर्मासप्रवेश
By Admin | Updated: July 2, 2017 03:02 IST2017-07-02T03:02:38+5:302017-07-02T03:02:38+5:30
कर्णाटक केशरी प.पू. गणेशलालजी म.सा. यांच्या सुशिष्या दक्षिण सिंहनी, नवकार अराधिका प.पू. प्रतिभाजी म.सा., प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी

प.पू. प्रतिभाजी म.सा. यांचा चातुर्मासप्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
बिबवेवाडी : कर्णाटक केशरी प.पू. गणेशलालजी म.सा. यांच्या सुशिष्या दक्षिण सिंहनी, नवकार अराधिका प.पू. प्रतिभाजी म.सा., प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनीताजी म.सा., प.पू. दक्षिताजी म.सा., प.पू. उदिताश्रीजी म.सा., प.पू. विशुद्धीजी म.सा. आदिठाणा यांचा आदिनाथ जैन स्थानकात चातुर्मासासाठी स्वागत जुलूस काढून प्रवेश कार्यक्रम झाला.
सकाळी ७ वाजता महावीर प्रतिष्ठान येथून हा स्वागत जुलूस महर्षीनगर मार्गे आदिनाथ जैन स्थानकात आणण्यात आला. या वेळी ‘भगवान महावीर स्वामी की जय, प.पू. गणेशलालजी म.सा. की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या प्रवेशासाठी व प.पू. प्रतिभाजी म.सा. यांना चातुर्मासाच्या शुभेच्छा देण्यासाठी ज्यांचा बिबवेवाडी जैन स्थानकात या वर्षी चातुर्मास आहे अशा संस्कारभारती, वाणिभूषण प.पू. प्रीतिसुधाजी म.सा., प.पू. अरुणप्रभाजी म.सा., प.पू. मधुस्मिताजी म.सा., प.पू. मंगलप्रभाजी म.सा., प.पू. जयस्मिताजी म.सा., प.पू. विजयस्मिताजी म.सा., प.पू. वैराग्यसुधाजी म.सा., प.पू. प्रेरणाजी म.सा., प.पू. प्रज्ञाजी म.सा., प.पू. संयमप्रीतीजी म.सा., प.पू. क्षमाश्रीजी म.सा., प.पू. विधीश्रीजी म.सा. सेवारत्न, तसेच सादडी सदनमध्ये ज्यांचा या वर्षीचा चातुर्मास आहे, अशा महासाध्वी प.पू. प्रियदर्शनाजी म.सा., प.पू. किरणप्रभाजी म.सा., प.पू. रत्नज्योतीजी म.सा., प.पू. विचक्षणश्रीजी म.सा., प.पू. अर्पिताश्रीजी म.सा., प.पू. वंदिताश्रीजी म.सा., प.पू. मोक्षदाश्रीजी म.सा. आदिठाणा यांची मुख्य उपस्थिती होती. प.पू. प्रतिभाजी म.सा. यांचे देशभरातील भक्त उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जैन कॉन्फरन्सचे पदाधिकारी, पुण्यातील अनेक जैन स्थानकांचे पदाधिकारी, अनेक जैन मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चातुर्मासासाठी रसिकलाल धारिवाल परिवार यांनी चार महिन्यांच्या गौतमप्रसादीची व्यवस्था केली आहे. धर्मसभा मंडपासाठी मनोज लुंकड व परिवार, प्रवेशद्वारासाठी महेंद्र सुंदेचा मुथ्था परिवार, प्रकाश बोरा परिवार, मंगलप्रवेशाच्या दिवशी मदनलाल बलदोटा परिवार यांच्या वतीने गौतम प्रसादी ठेवण्यात आली होती. आंमत्रण पत्रिकेसाठी भरत चंगेडे परिवार यांनी सहयोग दिला आहे, अशी माहिती धनराज सुराणा यांनी दिली.
प. पू. प्रतिभाजी म.सा. यांनी या वर्षीच्या चातुर्मासामध्ये कुठल्याही जैन व्यक्तीचा शाल, माला देऊन सन्मान न करण्याचा निर्णय घेतला आहे. जैन समाजातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले. केवळ दाते व काही विशेष व्यक्ती सोडून कोणाचाही सत्कार स्थानकामध्ये करू नये, अशी मागणी समाजातील नागरिकांकडून होत आहे.