शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'मी गावाकडे फोन केल्यावर...', कुसळं उगवणाऱ्या डोंगरावर 'अशा' पद्धतीने उभ्या राहिल्या पवनचक्क्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 20:01 IST

डोंगरावर फेरफटका मारताना जाणवलेल्या अनुभवाने राज्यातील पवनचक्की निर्मिती...

बारामती: ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी खामगळवाडी(ता.बारामती) येथे  आयोजित सेंद्रीय शेती मेळाव्यात बोलताना कुसळ उगवणाऱ्या डोंगरावर उभा राहिलेल्या पवनचक्क्यांची कहाणी सांगितली. डोंगरावर फेरफटका मारताना जाणवलेल्या अनुभवाने राज्यातील पवनचक्की निर्मिती झाल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

खामगळवाडी(ता.बारामती) येथे शेतकऱ्यांनी उभारलेल्या जोगेश्वरी किसान समृध्दी प्रोड्युसर कंपनी ली. चे उदघाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित सेंद्रीय शेती मेळाव्यात पवार बोलत होते. तत्पुर्वी मोर्फाच्या उपाध्यक्षा स्वाती शिंगाडे यांनी या प्रकल्पाची पार्श्वभुमी सांगितली. यावेळी माजी बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर, बारामती अ‍ॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, मोर्फाचे तज्ञ संचालक युगेंद्र पवार, सचिव प्रल्हाद वरे, अरविंद शिंगाडे आदी उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, त्यावेळी मुख्यमंत्री असताना मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या घरी मुक्कामी होतो. दुसऱ्या दिवशी सभोवतालच्या डोंगरावर जायची इच्छा व्यक्त केली. यावर पाटणकर यांनी डोंगरावर कुसळ उगवतात असे सांगितले. तसेच अवघड चढण असल्याने तिकडे जाताना येणार नसल्याचे म्हणाले. त्यानंतर देखील आपण हेलिकॉप्टरने जाऊ असे म्हणत पायलटला बोलावले.  हेलिकॉप्टर डोंगरावर सपाट जागेवर उतरवले.

डोंगरावर पोहचल्यावर वारा प्रचंड होता. त्यामुळे हेलिकॉप्टर देखील हालत होते, त्यावर याठिकाणी पवनचक्क्याची उभारता येतील, असे सांगितले. त्यावर सरकारी धोरण ठरवून पाटणमधील त्या डोंगर परिसरात पवनचक्क्या उभारण्यात आल्या. पाटण शिवाय सातारा, रत्नागिरी, सांगली, महाबळेश्वर, अहमदनगर, ठाणे अशा विविध जिल्ह्यात हजारो पवनचक्क्या उभ्या राहिल्या मी गावाकडे फोन केल्यावर पाऊसपाणी कसा आहे असे विचारतो. जेव्हा पाटणकरांना कॉल करतो तेव्हा गावाकडे वारा कसा आहे, अशी विचारणा करतो अस म्हणता एकच हशा पिकला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्र