शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

श्वेतपत्रिकेशिवाय भाषा धोरणाला बळकटी कशी येणार? साहित्य महामंडळाचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 15:00 IST

भूतकाळ आणि वर्तमानाचा अभ्यास केल्याशिवाय भाषा, साहित्य, संस्कृतीचे भविष्य ठरवता येत नाही.....

ठळक मुद्देशासनाने पुढाकार घेण्याची गरज समाजाची प्रगती भाषेच्या आधारे किती प्रमाणात झाली, याचा अभ्यास करणे गरजेचे राज्य शासनाने सांस्कृतिक धोरण तयार करताना असा मुलभूत पायाच केला नाही तयार राज्याचे सांस्कृतिक धोरण अशा प्रयत्नांअभावी निरर्थक ठरले तसेच भाषा धोरणाचेही होणार..?

- प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : गेल्या अर्धशतकात विकासाच्या प्रक्रियेने आणि संवाद-माध्यमांच्या तंत्रज्ञानाने भाषा, साहित्य व संस्कृतीसमोर आव्हाने निर्माण केली आहेत. भाषा धोरण ठरवताना सद्यस्थितीचा समग्र आढावा घेणारी श्वेतपत्रिकाच शासनाने इतक्या वर्षांमध्ये तयार केलेली नाही. श्वेतपत्रिकेशिवाय साहित्य, संस्कृतीविषयक धोरणाला बळकटी कशी येणार, असा सवाल साहित्य महामंडळातर्फे करण्यात आला आहे. महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. स्थित्यंतरांचा भूतकाळ आणि वर्तमानाचा अभ्यास केल्याशिवाय भाषा, साहित्य, संस्कृतीचे भविष्य ठरवता येत नाही. भाषिक राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. या समाजाची प्रगती भाषेच्या आधारे किती प्रमाणात झाली, याचा अभ्यास करणे गरजेचे असते. या स्थित्यंतरांचे विश्लेषण, कारणीमीमांसा करुन त्याचे सखोल शास्त्रीय अध्ययन श्वेतपत्रिकेतून केले जाते. महाराष्ट्राच्या स्थापनेआधी आणि त्यानंतर मराठीची स्थिती, त्यामागील कारणे, त्यावर झालेला खर्च, फलित काय, हे श्वेतपत्रिकेतूनच स्पष्ट होऊ शकते.बदलत्या समकालीन भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयक सद्यस्थितीचा समग्र आढावा घेणारी ह्यस्टेटस रिपोर्ट सारखी श्वेतपत्रिका तयार करण्याचे मार्गदर्शक काम आजवर राज्य शासनाकडून हाती घेतले नव्हते. श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सद्यस्थितीचा आढावा घेतल्याशिवाय भाषा धोरणाला गतिमानता मिळणेच शक्य नाही. राज्य शासनाने सांस्कृतिक धोरण तयार करताना असा मुलभूत पायाच तयार केला नाही. त्यामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये सांस्कृतिक धोरणासाठी कोणतीच तरतूदही झाली नाही, याकडे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी लक्ष वेधले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयक धोरणात श्वेतपत्रिकेची मागणी हिरिरीने केली आहे. श्वेतपत्रिका ही समकालाचा समग्र आढावा घेणारी, शास्त्रीय, विवेकी, समंजस असणारी आणि अभिनिवेश टाळणारी दृष्टी देणारी असावी, असेही धोरणात नमूद केले आहे. --...मराठी भाषिकांचे राज्य स्थापन झाल्यापासून आजवर महाराष्ट्रात व बाहेरही मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यावर किती पैसा खर्च झाला, खर्च व्हायला किती हवा होता, त्याचा अनुशेष कोणत्या विभागात किती,मराठी भाषा,साहित्य, संस्कृतीची स्थिती नेमकी कशी आहे, कशी असायला हवी होती व तशी ती का नाही, का झालेली नाही या व अशा सर्व बाबींच्या सर्वांगीण शास्त्रीय अध्ययनावर आधारित वास्तव समोर आणणे आवश्यक आहे. त्याचे विश्लेषण करून मगच राज्याचे भाषा, साहित्य,संस्कृती विषयक धोरण ठरवले गेले तरच त्या धोरणाला काही अर्थ असेल; अन्यथा राज्याचे सांस्कृतिक धोरण अशा प्रयत्नांअभावी निरर्थक ठरले तसेच भाषा धोरणाचेही होणार आहे. तसे होऊ नये यासाठी शासनाने मराठीची श्वेतपत्रिका तयार करून ती विधीमंडळासमोर मांडणे गरजेचे आहे. - डॉ. श्रीपाद जोशी, अध्यक्ष, धोरणा मसुदा समिती-धोरणात आणखी काय?मराठी ही आधुनिक ज्ञानविज्ञान, तंत्रज्ञान, नवतंत्रज्ञानाची भाषा व्हावी, यासाठी संबंधित संस्था, यंत्रणा, केंद्र आणि राज्य शासनाच्या पातळीवर आग्रह धरणे, अमराठी समाजगटांना मराठी आपलीशी वाटावी अशी साधने, प्रशिक्षण आणि संस्कृती विकसनावर भर देणे, बदलत्या व्यापकतेचा स्वीकार, प्रचार आणि प्रसार करणे, विकासाच्या संकल्पनेत संस्कृतीला स्वतंत्र स्थान निर्माण करणे, अनुवादावर भर देणे इत्यादी बाबींचा धोरण मसुद्यामध्ये समावेश केला आहे. संयुक्त महाराष्ट्राचे भाषिक, सांस्कृतिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आणि सुदृढ करण्यासाठी ऐक्यवादी भूमिकेचाही पुरस्कार केला आहे.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यmarathiमराठीState Governmentराज्य सरकार