शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 00:06 IST

दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीत नेमकं कोण विजयी होणार, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे.

Pune Lok Sabha ( Marathi News ) : पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा रंगतदार लढत झाली आहे. कारण भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे रिंगणात होते, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीत नेमकं कोण विजयी होणार, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे. अशातच मतमोजणीला अवघे काही दिवस बाकी असताना मुरलीधर मोहोळ यांनी एका मुलाखतीदरम्यान आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत मताधिक्याविषयीदेखील भाष्य केलं आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "पुणे लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित आहे. कारण लोकांनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान केलं आहे. मला सर्वाधिक मताधिक्य कोथरूड विधानसभेतून मिळेल. पण कसब्यातूनही मला मताधिक्य मिळेल, हे मी नक्कीच सांगू शकतो. पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये मला मताधिक्य असेल आणि ४ जूनला हे स्पष्टच होईल," असं मोहोळ यांनी म्हटलं. तसंच एकूण किती मतांनी विजय होईल, या प्रश्नावर बोलताना मोहोळ यांनी म्हटलं की, "गिरीश बापटसाहेब यांना जेवढं मताधिक्य मिळालं होतं, तेवढंच मताधिक्य मला पुणेकर देणार आहेत."

दरम्यान, काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडूनही विजयाचा दावा केला जात आहे. त्यामुळे पुण्याच्या लढतीत नक्की कोण विजयाचा गुलाल उधळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पुण्यातील राजकीय स्थिती, काय होती प्रचारादरम्यानची स्थिती?

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने अतिशय आक्रमकतेने पुण्यात काम करत लोकसभेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा फोकस जानेवारीपासूनच पुण्यावर होता. त्यामुळे भाजपने तगडा मराठा उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली. त्यानंतर अंतर्गत गटबाजीच्या चर्चाही काही काळ रंगल्या. हेच काँग्रेस पक्षाच्या बाबतीतही घडले. कसब्याच्या विजयानंतर चर्चेत आलेल्या रवींद्र धंगेकरांना महाआघाडीने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर  झाल्यानंतर लगेच पक्षांतर्गत कलह समोर आला.  थेट दुरंगी वाटणाऱ्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले. तर एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पूर्वी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अंतर्गत गटबाजी आणि मतांच्या ध्रुवीकरणामुळे अटीतटीची होणार आहे. सामना कोण जिंकणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :murlidhar moholमुरलीधर मोहोळravindra dhangekarरविंद्र धंगेकरpune-pcपुणे