मंत्रिमंडळात पुण्याचे किती कारभारी?

By Admin | Updated: October 28, 2014 23:51 IST2014-10-28T23:51:55+5:302014-10-28T23:51:55+5:30

भारतीय जनता पक्षाचे मंत्रिमंडळ देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली तयार होत असताना या मंत्रिमंडळात पुण्यातून किती कारभा:यांना संधी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

How many stewards of minister in cabinet? | मंत्रिमंडळात पुण्याचे किती कारभारी?

मंत्रिमंडळात पुण्याचे किती कारभारी?

पुणो : भारतीय जनता पक्षाचे मंत्रिमंडळ देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली तयार होत असताना या मंत्रिमंडळात पुण्यातून किती कारभा:यांना संधी मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. 
राज्यात नागपूर पाठोपाठ पुण्याने भाजपला सर्वाधिक पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात पुण्याचा दावा प्रबळ असणार आहे. सलग पाच वेळा निवडून गेलेले गिरीष बापट हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक ज्येष्ठ आमदार आहेत. तर दिलीप कांबळे यांनी युती शासनाच्या काळात मंत्रिपद सांभाळले आहे. याशिवाय महिला प्रतिनिधी म्हणून पुण्यातून सर्वाधिक मतांनी निवडून गेलेल्या माधुरी मिसाळ यांचाही विचार होऊ शकतो. 
जिल्ह्यातून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल निवडून आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वत: मंत्रिपद स्वीकारले नाही तर कुल यांना संधी मिळू शकते. 
याशिवाय आजर्पयत भारतीय जनता पक्षाला सातत्याने साथ देणा:या मावळ मतदारसंघातून दुस:यांदा निवडून गेलेले आमदार बाळा भेगडे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. याशिवायही एखादे अनपेक्षित नाव पुण्यातून येऊ शकते, अशीही एक चर्चा आहे. 
गेल्या 15 वर्षात राज्याच्या मंत्रीमंडळात पुण्याला अत्यंत तोकडे प्रतिनिधीत्वच मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, कॉँग्रेसचे हर्षवर्धन पाटील हे प्रभावी नेते जिल्ह्यातील असल्याने त्यांनाच संधी मिळत गेली. कॉँग्रेसने चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे यांना संधी दिली, मात्र कोणीही संपूर्ण कारकिर्द पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे मंत्रीमंडळात पुणो शहराचा प्रभाव कमीच राहिला आहे. (प्रतिनिधी)
 
पालकमंत्रिपद कळीचे 
जिल्ह्यात भाजपचे दोन आणि मित्र पक्षाचा एक असे तीन तर शहरातून मात्र आठ आमदार आहेत. त्यामुळे या वेळी पुणो शहराला पालकमंत्री 
पदावर संधी मिळेल. भाजपचे ज्येष्ठ आमदार  गिरीष बापट यांना मंत्रीपद मिळाल्यास तेच पालकमंत्री होतील, यात शंका नाही. मात्र, विधानसभा तालिकेवरील सदस्य असलेल्या बापट यांना विधानसभा अध्यक्षपदाचा मान दिल्यास पालकमंत्रीपदाबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबईतील एखाद्या नेत्याचीही या पदावर वर्णी लागू शकते. युती शासनाच्या काळात प्रमोद नवलकर हे पुण्याचे पालकमंत्री होते. 

 

Web Title: How many stewards of minister in cabinet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.