शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तुमची आपापसातली भांडणं आणखी किती दिवस लपवणार आहात ? कधीतरी ती चव्हाट्यावर येणारच : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 14:55 IST

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये धुसफूस सुरु आहे हे तर आम्ही वारंवार सांगत आलो आलो आहोत : चंद्रकांत पाटील

पुणे : राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. यावरून प्रशासकीय अधिकारी आणि महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांमध्ये यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महत्वाची टिप्पणी केली आहे. 

पुण्यात एसएनडीटी येथील एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, राज्यातील कोविड परिस्थिती आणि मंत्रिमंडळातील नाराजीनाट्यावर भाष्य केले. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये धुसफूस सुरु आहे हे तर आम्ही वारंवार सांगत आलो आलो आहोत. शेवटी तुमची आपापसातली भांडणे आणखी किती दिवस लपवून ठेवणार आहात. कधीतरी ते चव्हाट्यावर येणारच आहेत. आणि आगामी काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील आणखी प्रकरणे बाहेर येतील अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका वारकऱ्याला वापरलेले अपशब्दावरुन त्यांच्यावर सर्व समाजातूनच टीकेची झोड उठविली जात आहे. या प्रकरणावर भाष्य करताना पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हम करे सो कायदा, अरेरावी, भ्रष्टाचार हा स्थायीभाव आहे.आता त्यांच्याबरोबर सत्तेत राहून शिवसेनेला त्यांचा हा गुण लागला आहे. एका शिवसेनेच्या आमदाराने माझ्या कार्यालयात चिठ्ठी घेऊन येऊन येणाऱ्या नागरिकांनाच लस मिळेल अशाप्रकारचा फतवा काढला आहे. यावर काँग्रेसच्या आमदारानेच प्रत्युत्तर केले आहे. असेही ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांना पाटलांचा उपरोधिक टोला.. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची भेट घेतली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री या निमित्ताने का होईना बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी खरंतर मराठा आरक्षण, कोविड संकट यांच्याबाबतीत त्यांनी डबल मास्क, पीपीई किट घालून  एक ते दीड वर्षांपूर्वीच या गोष्टी करायला हव्या होत्या. मात्र, आता का होईना ते भेटी गाठी घेत आहेत ही त्यातल्या त्यात चांगली बाब म्हणावी लागेल अशा शब्दात पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना उपरोधिकपणे टोला लगावला आहे. 

जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यात का पडली वादाची ठिणगी..? काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांना लक्ष्य केलं होतं. जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्यानं बैठकीत उपस्थित मंत्री चकित झालं होते. पावसाळ्याच्या तोंडावर विभागाची विविध सिंचन प्रकल्प आणि कालव्यांशी संबंधित काही तातडीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना वित्त विभागाची मान्यता मिळाली असून नस्ती मंजूर झाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्याऐवजी कुंटे यांनी या नस्ती पुन्हा वित्त विभागाकडे पाठविल्यावरून पाटील नाराज असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेJayant Patilजयंत पाटील