शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आपली पत्रे लिक कशी झाली? : चंद्रशेखर यांचा वरवरा राव यांना सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 22:07 IST

परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर आहे.आपल्यातील संभाषणात अधिक गुप्तता पाळणे गरजेचे आहे, असा मेल चंद्रशेखर यांनी ४ जुलै रोजी राव यांना पाठवला होता.

ठळक मुद्देपोलिसांच्या हाती आला मेलमधील संवादराव यांनी १४ जुलैला उत्तर दिले असून त्यांच्या मेलमध्ये नमूद पोलिसांनी सादर केलेली पत्र खोटी असल्याचा बचाव पक्षाकडून आरोप

पुणे :  तपास यंत्रणा कोणत्या पद्धतींचा वापर करून या प्रकरणाचा तपास करत आहे? आपली पत्रे लिक कशी झाली? त्याला जबाबदार कोण आहे? असे सवाल करणारा मेल सेंट्रल कमिटेची प्रमुख चंद्रशेखर यांनी कवी वरवरा राव यांना पाठवला असल्याचे सरकारी वकिलांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. त्यावर राव यांनी तंत्रज्ञान समजावून घेवू, असे उत्तर चंद्रशेखर यांना दिल्याचा युक्तिवाद करण्यात आला.  एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये माओवाद्यांचा संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या शोमा सेन, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सुधा भारद्वाज, व्हर्णन गोन्सालवीस आणि अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी सादर केलेली पत्र खोटी असल्याचा आरोप बचाव पक्षाकडून करण्यात आला आहे. मात्र हे पत्र खरे असल्याची सांगत जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी राव आणि चंद्रशेखर यांच्यात ४ ते १४ जुलै २०१८ दरम्यान झालेल्या मेलवरील संभाषणाची माहिती न्यायालयाला दिली.    दिल्ली आणि महाराष्ट्रातून पाच जणांना अटक केल्यानंतर संघटनेतील सदस्यांचे मनोबल खचले आहे. आपली पत्रे लिक कशी झाली? त्याला जबाबदार कोण आहे? तपास यंत्रणा कोणत्या पद्धतीचा वापर करीत आहे हे समजावून घेण्याची गरज आहे. आता याबाबत काय करता येवू शकते याचे नियोजन करावे. परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर आहे. आपल्यातील संभाषणात अधिक गुप्तता पाळणे गरजेचे आहे, असा मेल चंद्रशेखर यांनी ४ जुलै रोजी राव यांना पाठवला होता. त्यावर राव यांनी १४ जुलैला उत्तर दिले असून त्यांच्या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे की, संदेशांमध्ये गुप्तता ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेत आहे. पोलिसांच्या तपासाबाबत अहवाल करून त्याची माहिती पुरविण्यात येईल. तसेच यापुढे वैयक्तिक मोबाइल फोन आणि संगणकांच्या वापरासाठी अधिक कठोर नियम ठेवण्यात येतील. असा संवाद या मेलमध्ये आहे. सुधा भारद्वाज यांच्याविरूध्द पाच पत्रे समोर आली आहेत. ती न्यायालयासमोर ठेवण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण पुरव्याच्या पातळीवर नसून तपासाच्या पातळीवर असल्याने आरोपींचा जामीन फेटाळावा अशी मागणी अ‍ॅड. पवार यांनी केली. ...........................तपास भरोसा ठेवण्यासारखा नाही न्यायालयात सादर करण्यात आलेली पत्र तपाण्यात आलेली नाही. पत्राच्या प्रती माध्यमांना मिळतात मात्र त्याची एकही प्रत पोलीस न्यायालयात वकीलांना दाखवत नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास भरोसा ठेवण्यासारखा नाही. तर मिलिंद एकबोटेंवर युएपीए अंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल करीत सुधा भारद्वाज यांच्यावकील अ‍ॅड. रागिनी अहुजा यांनी जामीन मंजूर करावा, अशी मागणी केली. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक