शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ मालिका चालवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणे कितपत योग्य? अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 19:11 IST

तुम्ही सोशल मीडियावर माझी लाज काढता. तुम्ही ३५ वर्षांपासून या चित्रसृष्टीत आहात. तुमची अशी भूमिका धक्कादायक आहे..

पुणे : मी स्वतः मालिका सोडली. त्यांनी मला काढले नाही. अलका ताईंनी केलेले आरोप अतार्किक आहेत. विवेक सांगळे याने माझ्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तरीही, केवळ मालिका चालवण्यासाठी नराधमांना पाठीशी घालणे योग्य आहे का? त्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर माझी लाज काढता. तुम्ही ३५ वर्षांपासून या चित्रसृष्टीत आहात. तुमची अशी भूमिका धक्कादायक आहे. ज्या माऊलीने मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. त्या आईबद्दल कोणी अपशब्द काढले तर ते मी कसे ऐकून घेईन? त्याचे तुम्हाला काहीच वाटू नये? असा संतप्त सवाल उपस्थित करत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

पुण्यात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. गायकवाड म्हणाल्या, प्रोजेक्ट साइन केला तेव्हा छोटे कपडे घालावे लागतील, असे सांगण्यात आले नव्हते. एका आर्टिस्टना जखम झाली होती, त्यांचे रक्त साडीला लागले होते. ती साडी मला नेसायला देण्यात आली. कोव्हीडच्या काळात असे करणे योग्य नाही. याबाबत माझ्या आईने केवळ प्रश्न उपस्थित केला. त्यावरून माझी आई सेटवर लुडबुड करते, असा आरोप होत असेल तर ते चुकीचे आहे.

एका व्हिडीओमध्ये त्या म्हणतात की आमच्या सेटवर शिवीगाळ होत नाही. दुसऱ्या व्हिडीओमध्ये म्हणतात की शिवीगाळ झाली. नेमके काय खरे? हा प्रश्न उपस्थित होतो. परंतू, आजही माझ्या मनात अलका कुबल यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे. मात्र, निर्माती म्हणून चुकीच्या गोष्टीविरोधात त्यांनी भूमिका घेणे आवश्यक होते. त्यांच्या या वागण्याची खंत वाटते.

.....

चार महिने शूटिंग केले एक रुपयाही नाही मिळाला... चार महिने शूटिंग सुरू होते. मात्र, आजपर्यंत एकाही दिवसाचे मानधन मिळालेले नाही.एक रुपयाही मिळाला नाही. तसेच मी सामान्य घरातील आहे. वडील काम करतात तेव्हा घरात चूल पेटते. तरीही मी कोविडची परिस्थिती समजून घेऊन जुलैपासून शूटिंग करत असून आजपर्यंत मानधन मिळाले नाही. तरी मी गप्प राहिले. केवळ मला बदनाम करण्यासाठी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. - प्राजक्ता गायकवाड 

टॅग्स :PuneपुणेPrajakta Gaikwadप्राजक्ता गायकवाडAlka Kubalअलका कुबल