शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
4
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
5
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
6
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
7
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
8
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
9
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
10
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
11
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
12
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
13
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
14
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
15
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
16
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
17
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
18
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
19
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
20
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी बसणार आता नळजोडाला मीटर, व्यावसायिकांपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:20 IST

समान पाणी योजनेची निविदा आता मंजूर झाल्याने लवकरच घरोघरी पाणी मोजणारे मीटर नळजोडाला बसवले जाणार आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्यानंतर पुणेकरांना पैसे मोजावे लागतील. वीज, गॅस ज्याप्रमाणे जपून वापरले जाते तसेच यापुढे पाणीही जपूनच वापरावे लागणार आहे.

पुणे : समान पाणी योजनेची निविदा आता मंजूर झाल्याने लवकरच घरोघरी पाणी मोजणारे मीटर नळजोडाला बसवले जाणार आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्यानंतर पुणेकरांना पैसे मोजावे लागतील. वीज, गॅस ज्याप्रमाणे जपून वापरले जाते तसेच यापुढे पाणीही जपूनच वापरावे लागणार आहे.संपूर्ण शहरात १ हजार ४०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्याच वेळी पाण्याच्या प्रत्येक नळजोडाला मीटर बसवले जाईल. एकूण ३ लाख मीटर बसवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात फक्त व्यावसायिक वापराच्या नळजोडांना मीटर बसवले जातील. ही संख्या साधारण ५० ते ६० हजार आहे. मात्र मीटर बसवतानाच या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असा प्रशासनाचा अंदाज आहे. अनेकांना नळजोड घरगुती वापराचा नोंदवला आहे, प्रत्यक्षात मात्र त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात आहे. प्रशासनाच्या तपासणी मोहिमेत ही पाणीचोरी सापडणार आहे, त्यांची घरगुती वापराची नोंद रद्द करून लगेचच त्यांना व्यावसायिक दर लावण्यास सुरुवात होईल.व्यावसायिक वापरकर्त्यांची संख्या निदान १ लाख तरी असेल, पण नोंदीच झालेल्या नाहीत. याशिवाय नळजोड अर्ध्या इंचाचा, पाणीपट्टीही तशीच जमा केली जाते, प्रत्यक्षात मात्र तो १ इंच आहे, किंवा नळजोड आहे मात्र त्याची नोंदच नाही अशीही अनेक प्रकरणे या समान पाणी योजनेच्या तपासणीत आढळणार आहेत, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या तपासणीत महापालिकेच्या एकूण नळजोडांमध्ये वाढही होणार आहे. त्यातूनही पाणीपट्टीचे उत्पन्न वाढणार असून, अनधिकृत नळजोड दंड आकारणी करून नियमितही केले जाणार आहेत.एका मीटरची किंमत साधारण ८ ते १० हजार इतकी आहे. ही सर्व मीटर अत्याधुनिक असून, संवेदक (सेन्सर) बसवलेली आहेत. त्यात काही फेरफार करण्याचा प्रयत्न झाला तर लगेचच मीटरसाठीच्या विभागात त्याची माहिती पोहोचेल, अशी त्याची रचना आहे. तसेच किती पाणी वापरले गेले हे त्या मीटरवरून तर कळणार आहेच, शिवाय पाणी मीटर विभागाची जबाबदारी सांभाळणाºया अधिकाºयालाही ती बसल्या जागेवर दिसेल. त्याचप्रमाणे बिल द्यायला आलेल्या कर्मचाºयांना त्यासाठी मीटर तपासावे लागणार नाही. तो त्या परिसरातून फिरायला लागला की पाण्याचा व्यावसायिक वापर करणाºया ग्राहकांकडून ती वसूल केली जाईल. हवे असेल तर संबधित ग्राहकाला त्यासाठी हप्ते करून दिले जातील व पाण्याच्या बिलात ते दाखवले जातील.घरगुती ग्राहकांना मात्र मीटरचे पैसे लावले जाणार नाहीत, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे. शहराचे पाच विभाग करण्यात आले आहेत. त्यात पुन्हा उपविभाग आहेत. प्रत्येक विभागात साधारण १ हजार नळजोड येतील अशी रचना करण्यात आली आहे. या रचनेला सुसंगत अशीच जलवाहिन्यांचीही रचना करण्यात येणार आहे. या १ हजार नळजोडांवरचे मीटर, त्यांना दिलेले पाणी, त्यांनी वापरलेले पाणी, त्याचे बिल, त्यांनी जमा केलेले बिल याची काटेकोर माहिती ठेवण्यात येणार आहे. त्यासाठीच स्वतंत्रपणे निविदा काढून खासगी कंपनीकडे हे काम दिले जाण्याची शक्यता आहे. त्याबदल्यात महापालिका त्यांना पैसे देईल. या रचनेत पाण्याची बचत होणे अपेक्षित आहे. पैसे द्यावे लागले म्हणजे पाणी जपूनच वापरले जाईल हे यात गृहीत धरण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी