शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

चोरट्यांनी फोडले पु. ल. देशपांडे यांचे भांडारकर रस्त्यावरील निवासस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 13:49 IST

भांडारकर रोडवरील पु. ल. देशपांडे यांचे निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ परंतु, घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळाले नाही.

ठळक मुद्देपहाटे दोनच्या सुमारास घडली़ घटना२००९ मध्ये त्यांच्या पत्नी सुनिताताई यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे हे घर बंद

पुणे : भांडारकर रोडवरील पु. ल. देशपांडे यांचे निवासस्थान फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ परंतु, घरातील कपाटांची उचकपाचक केल्यानंतरही त्यात काही मिळाले नाही़ भांडारकर रोडवर मालती माधव या इमारतीत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे रहायला होते़ सध्या तेथे कोणीही राहत नाही़ पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली़ पु़ ल़ देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर हे अमेरिकेला असतात़ अमेरिकेहून ते आज पहाटे मुंबईला आले व तेथून ते सकाळी पुण्यात दाखल झाले़ बंद घर पाहून चोरट्यांनी ते फोडून आत चोरी करण्याचा प्रयत्न केला़ घरातील कपाटांमध्ये उचकपाचक केली़ परंतु, तेथे त्यांना काहीही मिळाले नाही़ आसपासच्या तीन ते चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला आहे़ परंतु, त्यात काय चोरीला गेले याची माहिती मिळाली नाही़ या घटनेची माहिती मिळताच डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ पु. ल. देशपांडे यांच्या निधनानंतर २००९ मध्ये त्यांच्या पत्नी सुनिताताई यांचेही निधन झाले़ त्यानंतर त्यांचे हे घर बंदच असते़ बंद घर पाहून यापूर्वी चोरट्यांनी एप्रिल २०१२ मध्ये घरात शिरुन चोरीचा प्रयत्न केला होता़ चोरट्यांनी घरातील पुस्तके अस्ताव्यस्त करुन टाकली़ पण, त्यांना काहीही मिळाले नव्हते़ 

घरफोडीच्या घटनांमध्ये वाढशहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाली असून उपनगरांमध्ये दररोज किमान ३ ते ४ घरफोडीचा घटना होताना दिसत आहे़ या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी त्या रोखण्यात अजून तरी पोलिसांना यश आलेले दिसून येत नाही़ 

टॅग्स :deccan policeडेक्कन पोलीसPuneपुणे