पाच दिवसांत वाढले जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:20+5:302021-03-17T04:13:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोना वेगाने आपले पाय पसरत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस ...

पाच दिवसांत वाढले जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोना वेगाने आपले पाय पसरत आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या शिवाय कोरोना हॉटस्पाॅट असलेल्या गावांची संख्याही वाढली आहे. पाच दिवसांपूर्वी केवळ ५० गावे हॉटस्पॉट होती. मात्र, यात १७ ने वाढ होऊन जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या ६७ वर गेली आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात जानेवारीच्या सुरवातीला कोरोना बाधीतांची संख्या आटाेक्यात होती. मात्र, हीच संख्या फेब्रुवारी महिन्यापासून झपाट्याने वाढायला लागली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोना बाधितांची रोजची संख्या ही ५००वर पोहचली आहे. मंगळवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाग ५५९ कोरोना बाधीत आढळले तर पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भाग मिळून ३ हजार ५७४ रूग्ण आढळले. पुण्यात सर्वाधिक १९२५ रूग्ण कोरोना बाधीत आढळले. गेल्या गुरूवारी (दि ११) जिल्ह्यात १० पेक्षा जास्त कोरोना बाधितांची संख्या असलेल्या हॉटस्पाॅट असलेल्या गावांची संख्या केवळ ५० होती. यात नगरपालीका क्षेत्रात सर्वाधिक गावे होती. त्या पाठोपाठ बारामती, हवेली आणि शिरूरमध्ये सर्वाधिक गावे हॉटस्पॉट होती. मात्र, केवळ ५ दिवसांत हॉटस्पॉट गावांची संख्या ही १७ ने वाढली असून एकुण गावे ही ६७ झाली आहे. या गावांत १० पेक्षा जास्त रूग्ण आहेत.
हॉटस्पॉट गावांचा वाढता वेग हा चिंताजनक आहे. गावांनी हा वेग थांबवण्याच्या दृष्टीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. सर्वाधिक चिंताजनक परिस्थीती ही हवेली आणि बारामती तालुक्यात आहे. त्या पाठोपाठ जुन्नर, मुळशी, खेड तालुक्यात हॉटस्पॉट गावे सर्वाधिक आहेत. जानेवारी महिन्यात इंदापुर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, इंदापुरात कोरोना बाधित आणि हॉटस्पॉट गावांची संख्या हळुहळुु आटोक्यात येत आहे.
चौकट
वाढती रूग्णसंख्या चिंताजनक
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. सुरवातीला १०० आत रोज आढळनारे रूग्ण संख्या आता ५०० च्या घरात पोहचली आहे. मंगळवारी ५५९ कोरोनाबाधीत जिल्ह्यात आढळले. ही वाढती संख्या चिंताजनक आहे. यामुळे गावांनी लॉकडाऊनमध्ये केलेल्या उपाययोजना आता पुन्हा राबविण्याी गरज आहे.
चौकट
कारवाई तीव्र करण्याची गरज
कोरोनाबाधीतांचा वेग वाढता असलातरी नागरिकांमध्ये आजही बेफिकरीचे वातावरण आहे. सभा, समारंभ लग्नसोहळ्यात कोरोना नियमावलीचे पालन होत नाही. गर्दीच्या ठिकाणीही नागरिक मास्क लावत नसल्याने बाढीत दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिकांवर वचक बसवण्यासाठी तसेच कोरोनाचे गाभीर्य समजण्यासाठी कारवाई तिव्र करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावे
आंबेगाव : घोडेगाव (१४), म्हाळूंगे पडवळ (१५), अवसरी खुर्द (१६), मंचर (५६)
बारामती : माळेगाव बुद्रुक (३७), पणदरे (३९), गुणवडी (१६), मोरगाव (१३), बारामतीनगरपालीका (२५९)
भोर : नसरापुर (१३), भोर नगरपालीका (१७)
दौंड : यवत (२२), कुरकुंभ (११), लिंगाळी (१४), केडगाव (१७), दाैंड नगरपालीका (३०)
हवेली : देहू (३२), किरकटवाडी (१७), नांदेड (५३), नऱ्हे (५२), लोणीकाभोर (२७), मांजरी बुद्रुक (२२), कदमवाकवस्ती (२३), उरूळीकांचन (३०), वाघोली (१४७), केसनंद (१०),कोलावडी (१०), आव्हाळवाडी (१३)
इंदापुर : भीगवण (१५), निरगुडे (१२), इंदापुर नगरपालीका (३२)
जुन्नर : नारायणगाव (४०), वारूळवाडी (१५), ओतुर (१२), उंब्रज (२७), आळे(१०), पिंपळगाव (१२), जुन्नर नगरपालीका (२४)
खेड : कुरूळी (३५), मेदनकरवाडी (१५), नाणेकरवाडी (१२), निघोजे (१२), आळंदी नगरपालीका (४१), चाकण नगरपालीका (५८), राजगुरूनगर पालीका (४३)
मावळ : कामशेत (१४), वडगाव नगरपंचात (१८), लोणावळा नगरपालीका (१७), तळेगाव नगरपालीका (१२६)
मुळशी : बावधन (३१), भुगाव (१५), हिंजेवाडी (३२), माण (१४), महाळूंगे (१३), म्हारूंजी (२०), सुस (२४)
पुरंदर : गुळुंचे (११), पिंपरे खुर्द(१२), सासवड नगरपालीका (७०)
शिरुर : सणसवाडी (१२), शिक्रापुर (६६), तळेगाव ढमढेरे (१५), रांजणगावगणपती (११), न्हावरे (१९), पाबळ (१२), शिरूर ग्रामीण (२५), शिरुर नगरपालीका (५०).