एफडीएच्या रडारवर हॉटेल्स, टपऱ्या
By Admin | Updated: December 30, 2015 03:18 IST2015-12-30T03:18:46+5:302015-12-30T03:18:46+5:30
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबरच्या दिवशी अनेक जण हॉटेलमध्ये जाणे पसंत करतात. या वेळी बाहेरच्या खाण्यामुळे त्रास होऊ नये यादृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून

एफडीएच्या रडारवर हॉटेल्स, टपऱ्या
पुणे : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी ३१ डिसेंबरच्या दिवशी अनेक जण हॉटेलमध्ये जाणे पसंत करतात. या वेळी बाहेरच्या खाण्यामुळे त्रास होऊ नये यादृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून मोठी हॉटेल व खाण्याच्या लहान मोठ्या टपऱ्या या सगळ््यांची तपासणी केली जाणार आहे.
ज्या तारांकित आणि बाकीच्या मोठ्या हॉटेल्समध्ये पार्ट्या होणार आहेत अशा हॉटेल्सच्या तपासणीचा ड्राईव्ह सोमवारपासून सुरू झाला आहे. यामध्ये पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर येथील एफडीएचे सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्याचे सहायक आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिल्या आहेत. यात अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या परिशिष्ट ४ नुसार तपासण्या होणार आहेत.
नागरिकांच्या आरोग्याला अन्नातून कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी प्रामुख्याने हॉटेलचे स्वयंपाकघर तपासावे, आवश्यक तेथे अन्नाचे नमुने, कच्चा माल ताब्यात घेण्यात यावा, तसेच संशयास्पद ठिकाणी
साठा जप्त करण्याची कार्यवाही करावी, असे पत्रक केकरे यांनी काढले आहे. २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही मोहीम होईल, असेही त्यांनी पत्रकाव्दारे सांगितले आहे. (प्रतिनिधी)