दारूचे आगाऊ दिलेले १० रुपये मागितल्याने हॉटेल मालकाने केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:09 IST2021-06-28T04:09:39+5:302021-06-28T04:09:39+5:30
पुणे : दारूचे आगाऊ घेतलेले १० रुपये परत मागितल्याने हॉटेल मालक व वेटरने एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी समर्थ ...

दारूचे आगाऊ दिलेले १० रुपये मागितल्याने हॉटेल मालकाने केली मारहाण
पुणे : दारूचे आगाऊ घेतलेले १० रुपये परत मागितल्याने हॉटेल मालक व वेटरने एकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी हॉटेल मालकाला अटक केली आहे.
रमेश गोविंद संगम (वय ५७, रा. नाना पेठ) असे अटक केलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी सागर गायकवाड (वय ४२, रा. गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड हे भवानी पेठेतील हॉटेल संगममध्ये २५ जून रोजी रात्री आठ वाजता गेले होते. हॉटेल मालक व वेटरने दारूचे आगाऊ घेतलेले १० रुपये त्यांनी परत मागितले. यावरुन संगम याने शिवीगाळ करून लाकडी स्टम्पने गायकवाड यांच्या दोन्ही हातांवर व डोक्यावर मारून त्यांना दुखापत केली. सहायक पोलीस निरीक्षक खोपडे तपास करीत आहेत.