शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

20 हजार फुटांवर झेंडा फडकवून त्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 14:42 IST

पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्याराेहकांनी हिमालयातील माऊंट युनामवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला.

पुणे :  पुण्यातील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्याराेहकांनी हिमालयातील माऊंट युनाम हे 20044 फूट उंचीचे शिखर 15 अाॅगस्ट राेजी सर करून भारताचा राष्ट्रध्वज फडकवत अनाेख्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था ही 1993 साली स्थापन करण्यात अाली हाेती. संस्थेच्या 25 व्या वर्षपूर्तीनिमित्त ही विशेष माेहीम हाती घेण्यात अाली हाेती. या अाधी या संस्थेमार्फत सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक माेहिमा व रिबाेल्टिंग सारखे उपक्रम राबविले अाहेत. त्याचप्रमाणे दुर्ग संवर्धन संबंधाने जनजागृती सुद्दा करण्यात अाली अाहे. माऊंट युनाम ची माेहिम 15 दिवसांची हाेती. 15 ऑगस्ट 2018 रोजी पहाटे 3.25 वाजता संस्थेच्या  10 गिर्याराेहकांनी कॅम्प 1(5200मीटर) पासून शिखरा कडे चढाई करण्यास सुरुवात केली. सकाळी 10.33 वाजता प्रथम स्वप्नील गरड व गोपाळ कडेचुर यांनी शिखर माथा गाठला. पाठोपाठ 11.20 ला अनिकेत बोकील, प्रशांत अडसूळ व सदगुरु काटकर शेर्पान बरोबर शिखरावर पोहोचले. दहा मिनिटांनी 22 फूट उंच लोखंडी खांबावर 14 फूट रुंद × 21 फूट लांब राष्ट्रध्वज फडकावून 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात अाला.त्यावेळेस गोपाळ कडेचुर यांनी गिटारवर राष्ट्रगीत धून वाजवून उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. 

    संस्थेमार्फत दहा जणांनी या मोहीमेत सहभाग घेतला. ध्वजासाठी लागणारा लोखंडी खांब व पूर्ण ध्वज सर्वांनी स्वतः शिखरापर्यंत महतप्रयासाने पोहचवला. खांबाचे वजन 14.5 किलो व राष्ट्रध्वजाचे वजन 6.5 किलो होते. शिवाजी महाराजांची मुर्ती वर नेऊन त्याचे देखील पूजन करून शिव घोषणा यावेळी देण्यात आली. या माेहिमेची नाेंद लिम्का बुक अाॅफ रेकाॅर्डमध्ये नाेंद हाेईल असा विश्वास या गिर्याराेहकांनी व्यक्त केला. ही माेहिम फत्ते केल्यानंतर गिर्याराेहकांना अाकाश ठेंगणे झाले हाेते.  

    या माेहिमेत सुनिल पिसाळ,  प्रशांत अडसुळ,  धनराज पिसाळ, गोपाळ कडेचुर, स्वप्निल गरड ,  सोमनाथ सोरकादे, सद्गुरू काटकर, अनिकेत बोकिल, अभिजित जोशी, सायली महाराव यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याIndependence Dayस्वातंत्र्य दिवस