वसतिगृहावरून पालिकेत गोंधळ
By Admin | Updated: August 5, 2014 23:57 IST2014-08-05T23:57:00+5:302014-08-05T23:57:00+5:30
शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेकडून मुलींसाठी बांधण्यात येणा:या शारदाबाई पवार वसतिगृहाच्या जागेवरून महापालिकेत गोंधळ सुरू झाला आहे.

वसतिगृहावरून पालिकेत गोंधळ
पुणो : शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेकडून मुलींसाठी बांधण्यात येणा:या शारदाबाई पवार वसतिगृहाच्या जागेवरून महापालिकेत गोंधळ सुरू झाला आहे. या वसतिगृहासाठी घोले रस्ता येथे जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत महापौर चंचला कोद्रे यांनी हे वसतिगृह मुंढवा, हडपसर भागात व्हावे, असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला आपल्या भागाला प्राधान्य दिले असल्याचा आरोप शिवसेना आणि भाजपाच्या स्थायी समिती सदस्यांनी केला आहे.
तर, हे वसतिगृह मुंढवा येथे
नसून खडकवासला येथे होणार असल्याचा दावा महापौर चंचला कोद्रे यांनी केला
आहे. त्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडली आहे.
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महपालिकेच्या वतीने मुलींचे वसतिगृह बांधण्यात येणार होते. पालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात दोन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष विशाल तांबे यांनी आपल्या बजेटमध्ये शारदाबाई पवार यांच्या नावाने हे मुलींचे वसतिगृह बांधावे, असे सांगितले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातच हे वसतिगृह असावे, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, घोले रोडला जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत हे वसतिगृह हडपसर येथील मगरपट्टा सिटी येथे उभारावे, असा ठराव दोन आठवडय़ांपूर्वी महापौर कोद्रे यांनी स्थायी समितीकडे दिला होता. त्यानुसार, गेल्या आठवडय़ात यावर प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यानुसार, आज स्थायी समितीच्या बैठकीत हे वसतिगृह मुंढवा येथे उभारणार असल्याचे आणि त्यासाठी 8क् लाख रुपयांचे वर्गीकरण मान्य केल्याचे
स्थायी समिती अध्यक्षांनीही पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे गोंधळात आणखीनच वाढ झाली. मात्र, महापौरांनी
ही बाब चुकीची असल्याचा दावा
केला आहे. तसेच, विरोधकांकडून करण्यात आलेले आरोपही चुकीचे असल्याचे
त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आपला प्रस्ताव नवीन वसतिगृहाचा - महापौर
मगरपट्टा येथे उभारलेले जाणारे मुलींचे वसतिगृह हे दुसरे वसतिगृह आहे. कोद्रे हॉस्पिटलच्या खर्चातील पैसे वर्गीकरणाद्वारे देण्यात आले आहेत, असे महापौर चंचला कोद्रे यांनी स्पष्ट केले. नगरसेवक धंगेकर यांना हा विषय समजलाच नाही. घोले रोड येथे जागा उपलब्ध नसल्याने शारदाबाई पवार मुलींचे वसतिगृह खडकवासला मतदारसंघात करावे, असा ठराव यापूर्वीच पालिकेत करण्यात आलेला आहे. त्यामुळे शारदाबाई पवार वसतिगृह दुसरीकडे बांधण्याचा आरोप चुकीचा आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, स्थायी समिती अध्यक्षांनाही हा विषय समजला नसल्याचा दावा कोद्रे यांनी केला आहे.