शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

हाॅस्पिटलकडून अद्यापही रुग्णांची फसवणूक सुरूच : अजित पवार यांचे यंत्रणेला कडक कारवाई आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 18:12 IST

जादा बिल घेणाऱ्या व महात्मा फुले योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करा 

ठळक मुद्देविधानभवन येथे कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत " पोस्ट कोविड रुग्णांचा सर्वेक्षण " 

पुणे : शहरासह ग्रामीण भागात देखील आजही खाजगी हाॅस्पिटलकडून कोरोना रुग्णांची पिळवणूक केली जाते. बिल तपासण्यासाठी समिती नियुक्त केली असली तरी बिल दिल्याशिवाय डिस्चार्ज दिला जात नाही, महात्मा फुले योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांकडून सर्व कागदपत्रे घेऊन लाभ दिला जात नाही आणि शासनाकडून पैसे वसूल करतात अशा अनेक तक्रारी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या. यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अद्याप ही खाजगी हाॅस्पिटलकडून रुग्णांची फसवणूक सुरूच आहे. यामध्ये जादा बिल घेणाऱ्या व महात्मा फुले योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे आदेश प्रशासनाला दिले.           विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. या  बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनिल शेळके, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,  पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.           उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहिम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे, या मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे, यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल, त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.------माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत " पोस्ट कोविड रुग्णांचा सर्वेक्षण " पुण्यास संपूर्ण राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना नंतर इतर अनेक त्रास होत असून, अनेक जणांना प्राण देखील गमवावे लागले आहेत.  या पार्श्‍वभूमीवर पुण्यास लवकरच सर्वत्र पोस्ट कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतील, तसेच राज्यात सध्या " माझे कुटुंब माझी जबाबदारी " या मोहिमेच्या पुढील टप्प्यात पोस्ट कोविड रुग्णांचे देखील सर्वेक्षण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले. -------औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाच्या औषधांचा काळाबाजर सुरू आहे. पुण्याला दररोज सरासरी दहा हजार रेमडेसिव्हिर लागत असताना सध्या चार, साडे चार हजाराच उपलब्ध होतात. सर्वसामान्य नागरिकांना तर ही औषधे, इंजेक्शन मिळतच नसल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या.  यावर  माझ्यासह पक्षाचे नेते शरद पवार साहेब यांचे देखील यावर बारीक लक्ष आहे. सध्या सरसकट या औषधांचा वापर सुरू आहे. याबाबत देखील आता शासनाने नियम घालून दिले आहेत  तसेच औषधांचाही काळाबाजार करणा-यांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तMayorमहापौर