शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

चासकमान येथे भरदिवसा बिबट्या दिसल्याने एकच खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:05 IST

ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची नांगरट करत असताना मयूर घनवट यांना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने चासपरिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगामातील पिकांची कामे सुरु असल्याने अहमदनगर,पारनेर,संगमनेर,भागातील अनेक मेंढपाळ परिसरात दाखल वृक्षतोड थांबवण्यासाठी कडक उपाय योजना करण्याची गरज

तुषार मोढवे चासकमान:- घनवटवाडी येथे शेतामध्ये रविवारी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची नांगरट करत असताना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने चास परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने जंगली प्राण्यांचा वावर सतत पाहावयास मिळत असतो. परंतु, आता बिबट्या व बछडे दिसल्याने परिसरातील नागरिक घराच्या बाहेर येण्यास घाबरत असून वनविभाने पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.     मागील तीन दिवसांपूर्वी चासकमान परिसरातील मोहकल येथील शेतकरी विठ्ठल तुकाराम राऊत यांच्या दोन शेळी तर किसन रणपिसे व संजय सिताराम राऊत यांच्या प्रत्येकी एक शेळी लांडगा व तरसाने पकडून नेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरातील शेतकरी भितीच्या सावटखाली होते व आहे.त्यातच रविवारी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास चास व परिसरात गावात मागील दहा ते बारा दिवसांपासून बिबट्या, लांडगा, तरस या प्राण्यांनी अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. रात्रीच्या वेळेस परिसरात हे प्राणी चासकमान धरणाच्या आखरवाडी, मोहकल जवळील डाव्या कालव्यावर तसेच विहिरीवर पाणी पिण्यासाठी येत असतात. रात्रीच्या वेळेस अंधाराचा फायदा घेऊन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या यांचा फडशा पाडत असल्याची घटना वारंवार घडत आहे. या परिसरात रब्बी हंगामातील पिकांची कामे सुरु असल्याने अहमदनगर,पारनेर,संगमनेर,भागातील अनेक मेंढपाळ परिसरात दाखल झाले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक लाकूड व्यावसायिक भरदिवसा अनेक वृक्षांची राजरोस कत्तल करण्यात येत आहे. यामुळे वृक्षतोडीवर कडक अमंल बजावणी करुन वृक्षतोड थांबवण्यासाठी कडक उपाय योजना करण्याची गरज आहे. 

टॅग्स :KhedखेडFarmerशेतकरीforestजंगल