शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पुणे महामार्गावर भीषण अपघात; कात्रजजवळ ८ वाहने एकमेकांना धडकली, ३ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 08:59 IST

सातार्‍याहून पुण्याकडे येणार्‍या दरी पुलानंतर अनेक ठिकाणी मोठा उतार आहे.

पुणे : सातारा पुणे महामार्गावर कात्रज आंबेगाव येथे पहाटे ८ वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला. त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत़ अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या सहाय्याने गाड्या बाजूला करुन आतील वाहनचालकांची सुटका केली़ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी, सातार्‍याहून पुण्याकडे येणार्‍या दरी पुलानंतर अनेक ठिकाणी मोठा उतार आहे. कात्रज आंबेगाव येथील स्वामी नारायण मंदिराजवळही असाच एक तीव्र उतार आहे. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक ट्रक दगड घेऊन सातार्‍याकडून पुण्याकडे येत होता. त्याला मागून आलेल्या ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे ही दोन्ही वाहने रस्त्यात अडकून पडली. त्याच्या मागोमाग आलेल्या वाहनांना ही रस्त्यातील वाहने दिसली नाही. त्यांनी एका पाठोपाठ पुढच्या वाहनांना धडक दिली. येथे उतार असल्याने अचानक समोर वाहन दिसल्यावर मालट्रकचा वेग कमी करता येत नाही.

परिणामी ते पाठीमागून पुढच्या वाहनाला जाऊन धडकतात.या दोन ट्रकच्या मागून एक कार येत होती. तिने पुढच्या ट्रकला जोरात धडक दिली. ही वाहने एकमेकात अडकली. त्यामुळे कारमधील दोघे आणि ट्रकचालक हे आतमध्ये अडकून पडले होते. पुणे अग्निशामक दल आणि पीएमआरडीएचे अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी क्रेनद्वारे ही वाहने बाजूला करुन आतील जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात २ कार आणि ६ ट्रक एकमेकांना काही काही अंतरावर धडकले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे