विकासच ठरणार विजयाची नांदी
By Admin | Updated: February 13, 2017 02:22 IST2017-02-13T02:22:40+5:302017-02-13T02:22:40+5:30
कात्रजचा केलेला विकासच विजयाची नांदी ठरणार असल्याचे मनसेचे उमेदवार नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केले. मनसेचे

विकासच ठरणार विजयाची नांदी
कात्रज : कात्रजचा केलेला विकासच विजयाची नांदी ठरणार असल्याचे मनसेचे उमेदवार नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केले.
मनसेचे प्रभाग क्रमांक ४० चे उमेदवार वसंत मोरे, अमित बेलदरे, सारिका विकास फाटे, दीपाली अमोल काकडे यांनी पदयात्रा काढली होती. मोरे म्हणाले, ‘‘विकासामुळे ऐतिहासिक कात्रजचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन ठेवले आहे. कात्रज भागाचा विकासकामातून केलेला कायापालट हाच मुद्दा मनसेच्या विजयाची नांदी ठरणार आहे.’’
शिवाजंली मित्र मंडळ, दत्तनगर-जांभुळवाडी रस्ता, टेल्को सोसायटी, इंद्रायणीनगर भागात पदयात्रा काढण्यात आली. संजय मोरे, योगेश खैरे, जंयत गिरी, विकास फाटे, अमोल काकडे, नितीन जगताप, बाळकृष्ण फाटे, नंदू घाटे, जीतू ओतारी, प्रदीप बेलदरे, गणेश खुटवड, दत्तात्रय चव्हाण, नितीन रेणुसे, नीलिमा तारवडे, मनीषा सातपुते, प्रशांत फाटे, महेश खेडेकर, बाळासाहेब फाटे, प्रतीक कोडेकर, किशोर दारवाडकर, मंगेश दहीवडकर, सुहास देशमुख,
बंडू सूर्यवंशी, मुनीर तांबोळी,
हाजीलाल तांबोळी, सदीप जांभळे, रामभाऊ सणस, मयूर वाघमारे आदी सहभागी झाले होते.