शिरूरमधील हुडकोची घरे मालकांच्या नावावर होणार
By Admin | Updated: July 21, 2014 04:03 IST2014-07-21T04:03:21+5:302014-07-21T04:03:21+5:30
येथील हुडको वसाहतीतील नागरिकांचा घरे नावावर होण्याबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, १९८९च्या शासकीय दरानुसार प्रत्येकी १५ हजार रुपये शासनाकडे जमा केल्यावर हुडकोवासीयांच्या नावे घरे

शिरूरमधील हुडकोची घरे मालकांच्या नावावर होणार
शिरूर : येथील हुडको वसाहतीतील नागरिकांचा घरे नावावर होण्याबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, १९८९च्या शासकीय दरानुसार प्रत्येकी १५ हजार रुपये शासनाकडे जमा केल्यावर हुडकोवासीयांच्या नावे घरे होणार आहेत.
१९८९मध्ये हुडको वसाहत निर्माण झाली. या घरांचे हप्ते २००५मध्ये संपले. यानंतर संबंधितांच्या नावे ही घरे होणे अपेक्षित होते. मात्र, हा विषय काही कारणास्तव प्रलंबित राहिला. या घरांचे हप्ते फिटल्याचा ना हरकत दाखला नगर परिषदेला २००९मध्ये मिळाला. दरम्यान २००७ पासून प्रशासकीय क्लिष्ट पद्धतीचा यात फटका बसला. रसिकलाल धारिवाल यांनी आमदार अॅड. अशोक पवार यांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर त्यांनी संबंधित मंत्रालय व प्रशासकीय विभागाशी चर्चा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मुद्रांक जिल्हाधिकारी
राजपूत यांची मागच्या पंधरवड्यात भेट घेतल्यानंतर त्यांनी यात त्वरित लक्ष घालून हुडकोसाठी १९८९मध्ये जागेचा अग्रीम ताबा घेतला.
मात्र, त्या जागेची रक्कम भरण्याचे बाकी असल्याचे आमदारांना
सांगितले व ३७१ घरमालकांना प्रत्येकी किती रक्कम भरावयास लागेल, याबाबत अडकलेली प्रक्रिया त्यांनी पुढे नेली.
दरम्यान, नगर परिषदेत काल रात्री हुडकोवासीयांची सभा घेण्यात आली. शासनाने जी रक्कम भरावयास सांगितली आहे, ती १९८९च्या शासकीय दरानुसार असल्याने सर्वांनी लवकरात लवकर ही रक्कम भरावी, असे आवाहन धारिवाल यांनी केले.
या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावलेले नगरसेवक विजय दुगड यांनी या प्रश्नाचा आढावा सादर केला. नगराध्यक्षा सुवर्णा लटांबळे, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे, माजी नगराध्यक्ष रवींंद्र ढोबळे, नगरसेवक जाकिरखान पठाण, महेंद्र मल्लाव, दादाभाऊ वाखारे, प्रवीण दसगुडे, आबीद शेख, संतोष भंडारी, नगरसेविका सुवर्णा लोळगे, मनीषा गावडे, कविता वाटमारे, संगीता शेजवळ, शैला साळवे, सुनीता कालेवार, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, बाजारसमितीचे संचालक राजेंद्र गावडे, माजी नगरसेवक नीलेश लटांबळे, सुनील बाफणा, मुजफ्फर कुरेशी, रामलिंग ट्रस्टचे खजिनदार भाऊसाहेब खेडकर आदी या वेळी उपस्थित होते.
(वार्ताहर)