स्मार्ट ग्राम आंबेठाण येथे महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:55+5:302021-03-09T04:11:55+5:30
यावेळी सरपंच संघमित्रा नाईकनवरे, पोलीस पाटील तृप्ती मांडेकर, ग्रा.पं.सदस्या कल्पना मांडेकर, रुपाली मांडेकर, सारिका आरडे, तुळसाबाई घाटे, अहिल्या पडवळ, ...

स्मार्ट ग्राम आंबेठाण येथे महिलांचा सन्मान
यावेळी सरपंच संघमित्रा नाईकनवरे, पोलीस पाटील तृप्ती मांडेकर, ग्रा.पं.सदस्या कल्पना मांडेकर, रुपाली मांडेकर, सारिका आरडे, तुळसाबाई घाटे, अहिल्या पडवळ, रूपाली गोणते, जयश्री दवणे, स्वाती केदारी, शीतल सुतार, निलम गोणते, सविता मानमोडे, रुपाली विरकर, राजश्री गायकवाड, लक्ष्मी मांडेकर यांच्यासह कर्मचारी व कामगार महिला उपस्थितीत होत्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्मार्ट ग्राम आंबेठाण ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील महिलांसाठी नाममात्र एक रुपयांत सॉनिट्री नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी मशीन बसवण्यात आली आहे. याचे उद्घाटन सरपंच संघमित्रा नाईकनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला होता. यावेळी पुणे जिल्हा पोलीस पाटील महिला संघाच्या जिल्हाध्यक्षा तृप्ती मांडेकर यांच्या हस्ते महिला सरपंच व सदस्यांना सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
फोटो : आंबेठाण येथील महिला सरपंच व सदस्यांचा सन्मान करताना.