माजी सैनिकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:13 IST2021-08-22T04:13:27+5:302021-08-22T04:13:27+5:30

पुणे : गुरुवर्य संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशनने स्वातंत्र्यदिनी शिवनेरी किल्ल्यावर सार्जंट रामदास मेहेर (हवाईदल सेना), सार्जंट सुभाष बिडवई ...

Honoring ex-servicemen | माजी सैनिकांचा सन्मान

माजी सैनिकांचा सन्मान

पुणे : गुरुवर्य संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशनने स्वातंत्र्यदिनी शिवनेरी किल्ल्यावर सार्जंट रामदास मेहेर (हवाईदल सेना), सार्जंट सुभाष बिडवई (हवाईदल सेना), सुभेदार बबन जुंदरे (स्थल सेना), हवालदार दिलीप आरोटे (स्थल सेना), हवालदार रमेश खरमाळे (स्थल सेना), लिडींग सीमॅन दशरथ डोंगरे (नौसेना), सार्जंट सुरेश भोर(हवाईदल), कॅप्टन महादेव हाडावळे (स्थल सेना), सी. पी. एस. देविदास भुजबळ (वायुसेना), सार्जंट ज्ञानदेव थोरवे (वायुसेना), हवालदार नवनाथ गाढवे (स्थल सेना), अनिल जोगळेकर (हवाईदल) यांचा सन्मान केला. तेजस जाधव यांंनी प्रास्तविक केले. रमेश खरमाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अमरसिंह भोरे यांंनी आभार मानले. फाउंडेशनचे शैलेश खाणेकर, नीलेश खाणेकर, किरण पिरंगुटे, यश खाणेकर, नीलेश निर्मले यावेळी उपस्थित होते.

-----------------------

कबड्डीपटूच्या हस्ते ध्वजवंदन

पुणे : सुवर्णयुग सहकारी बँकेच्या वतीने भारतीय कब्बडी महिला संघाची माजी कर्णधार सुमती पुजारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या कँन्टोन्मेट विधानसभा सरचिटणीस सुवर्णा भरेकर, बँकेचे अध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी, संचालक राजाभाऊ घोडके यावेळी उपस्थित होते.

----------------

वर्धापनदिनी वृक्षारोपण

पुणे : जनशक्ती विकास संघाचा दुसरा वर्धापनदिन हडपसर, काळेपडळ परिसरातील उद्यानात वृक्षारोपण करून साजरा झाला. अध्यक्ष सोफी असिफ, माऊली साळुंखे, अनिल तिवारी यांंनी संयोजन केले. डॉ. शोभनाथ यादव, संजय सातव, सुफियान खान, सारिका खान आदी यावेळी उपस्थित होते.

---------------

सुनील जाधव रोजगार आघाडीचे अध्यक्ष

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीच्या शहराध्यक्षपदी सुनील जाधव यांची निवड झाली. आघाडीचे राज्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Honoring ex-servicemen