‘राष्ट्रवादी’च्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:16 IST2021-03-13T04:16:42+5:302021-03-13T04:16:42+5:30

पुणे : कोरोनाच्या काळात चांगले काम करणाऱ्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रभाग क्रमांक नऊच्या वतीने ...

Honoring the administrative officers on behalf of the NCP | ‘राष्ट्रवादी’च्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

‘राष्ट्रवादी’च्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

पुणे : कोरोनाच्या काळात चांगले काम करणाऱ्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रभाग क्रमांक नऊच्या वतीने करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, बाणेर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या वैशाली देसले (सहायक संचालक, साखर आयुक्तालय), अनुराधा ओक (शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र राज्य), पौर्णिमा गायकवाड (पोलिस उपायुक्त), आनंदी पाटील (सदस्य, व्यवस्थापकीय समिती, आयटीआय, औंध), प्रेरणा कट्टे (सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा), समरत्ना पाटील (डी.सी.पी.एस.पी. वायरलेस), माधवी गरुड (विभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण), नंदा भुजबळ (पोलीस कॉन्स्टेबल) या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा कार्यक्रम न घेता प्रत्येकाच्या घरी जाऊन हे सत्कार घेण्यात आले. याप्रसंगी सरला चांदेरे, प्रा़ रुपाली बालवडकर, पूनम विधाते, राखी श्रीराव, सुषमा ताम्हाणे यांच्यासह नगरसेवक बाबूराव चांदेरे, अर्जुन ननावरे, संजय ताम्हाणे, समीर चांदेर, माणिक गांधिले आदी या वेळी उपस्थित होते.

------------------------

फोटो मेल केला आहे़

फोटो ओळी = महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांचा सत्कार करताना सरला चांदेरे, प्रा़ रुपाली बालवडकर, पूनम विधाते, राखी श्रीराव, सुषमा ताम्हाणे व आदी.

Web Title: Honoring the administrative officers on behalf of the NCP