समर्थ ज्युनिअर कॉलेजमधील १२ वीच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST2021-09-22T04:13:07+5:302021-09-22T04:13:07+5:30

समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हा येथे नुकताच १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे उपाध्यक्ष ...

Honoring 12th meritorious students of Samarth Junior College | समर्थ ज्युनिअर कॉलेजमधील १२ वीच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

समर्थ ज्युनिअर कॉलेजमधील १२ वीच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हा येथे नुकताच १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जुन्नर तालुका शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष प्रा. एच. पी. नरसुडे, रामभाऊ सातपुते, मुख्याध्यापक नानासाहेब झावरे, प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, समर्थ एम. बी. ए.चे प्राचार्य राजीव सावंत, प्राचार्य डॉ.अनिल पाटील, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे डॉ. सुभाष कुंभार, प्राचार्य अनिल कपिले, प्राचार्य डॉ. सतीश कुऱ्हे आदी उपस्थित होते.

प्रा. संतोष पोटे, प्रा. राजेंद्र नवले, प्रा. विनोद चौधरी, प्रा. सुरेखा पटाडे यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रा. भूषण बोऱ्हाडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. राजीव सावंत यांनी, तर आभार प्रा. प्रदीप गाडेकर यांनी मानले.

Web Title: Honoring 12th meritorious students of Samarth Junior College