पुणे: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील राज्याच्या पोलीस वायरलेस विभागाचे संचालक व अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार आणि लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांना उल्लेखनीय सेवेबद्दल तर पोलीस दलातील इतर ८ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
"पुणे पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, १० जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदकाचा बहुमान!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 21:00 IST
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने पोलीस सेवेतील उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी केली जाते 'राष्ट्रपती पदक'ची घोषणा
पुणे पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, १० जणांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदकाचा बहुमान!
ठळक मुद्देयंदा पुण्यातील १० जणांना हे राष्ट्रपती पदक जाहीर