शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गुणवंत मुलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 14:55 IST

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्यावतीने कचरा वेचकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेत झालेल्या या कार्यक्रमामध्ये १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देकागद काच पत्रा कष्टकरी पंचायत जातीभोवती बांधली गेली नाही : डॉ. बाबा आढावअनेक एसी आॅफिसेसमध्ये चहा देत असताना आपणही शिकायला हवे अशी जाणिव झाली : - वैभव

पुणे : शतकानुशतके शिक्षणाचा अधिकार नाकारल्या गेलेल्या वर्गाला शिक्षित करण्यासाठी समाजाने पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. कचरा उचलून गुजराण करणे, कचराच उपजीविकेचे साधन होणे यापेक्षा वाईट आणखी काय असू शकते. या कामाचा आदर आणि सन्मान केला जात नाही. याच भुकेने आपल्याला एकत्र आणले आहे. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत जातीभोवती बांधली गेली नसल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीच्यावतीने कचरा वेचकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यावेळी संघटनेच्या पौर्णिमा चिकरमाने, लक्ष्मी नारायण, सुमन मोरे आदी उपस्थित होत्या.

डॉ. आढाव म्हणाले, ‘पुणे महानगर पालिकेच्या एकूण कामांपैकी २० टक्के काम कचरा वेचक करतात. स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून स्वच्छतेसंदर्भातील मोलाचे काम करुन दाखवून दिले आहे.’

यावेळी सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, टेक महिंद्रा, एस. एन. डी. टी., एस. के. एफ. फाउंडेशन, प्रयास, स्वच्छ, अभय अभियान, हरिती प्रकाशन, आयुका, लाईट हाउस अशा अनेक संस्थांनी मार्गदर्शनपर स्टॉल्स लावले होते. आगळ्या वेगळ्या पद्धतीची व्यसन, पुरुषसत्ताक, भांडवलशाही, कौटुंबिक हिंसाचार आदी विषयांवरील दहीहंडी बांधण्यात आली होती. यावेळी तरुणांनी अन्याय सहन करणार नाही आणि अन्याय होऊ देणार नाही अशी शपथ घेतली. मद्यपान, व्यसनाधिनतेवर नाटक सादर केले.  

जर संधी मिळाली तर आमची मुलेही नक्कीच पुढे जाऊ शकतील. आमच्यासारख्या कचरा वेचकांच्या मुलांचा झालेला सत्कार पाहून खूप आनंद झाला आहे. यामधून मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.’ अशा शब्दात कोंढव्यात राहणाऱ्या कचरा वेचक अप्सरा शेख यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

माझे पालक कचरा वेचक असून माझे पालक कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीचे सभासद आहेत. दहावी नापास झाल्यानंतर चहाच्या टपरीवर काम करायला सुरुवात केली. अनेक एसी आॅफिसेसमध्ये चहा देत असताना आपणही शिकायला हवे अशी जाणिव झाली. नवी स्फूर्ती घेऊन मी पुन्हा शिक्षणाकडे वळलो. माझे बी. कॉम. पूर्ण केले. आता मी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेमध्ये प्रभाग समन्वयक म्हणून काम करीत आहे. संघटनेने दिलेल्या पाठबळावर माझी वाटचाल होऊ शकली. - वैभव

 

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावPuneपुणे