हुतात्म्यांबद्दल आस्था आणि आदर हवा
By Admin | Updated: March 24, 2017 03:46 IST2017-03-24T03:46:05+5:302017-03-24T03:46:05+5:30
‘‘आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यामागे देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा राजगुरुंसारख्या अनेक हुतात्म्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

हुतात्म्यांबद्दल आस्था आणि आदर हवा
दावडी : ‘‘आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यामागे देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा राजगुरुंसारख्या अनेक हुतात्म्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांची आठवण जयंती-पुण्यतिथीच्या वेळी न काढता हुतात्म्यांबद्दल आस्था व आदर बाळगून त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण सतत जिवंत ठेवायला हवी,’’ असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.
हुतात्मा राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, सुभद्रा शिंदे, अॅड. देवेंद्र बुट्टे-पाटील, राम पठारे, इंदिरा अस्वार, उषा कानडे, नगराध्यक्षा सारिका घुमटकर, बापूसाहेब थिगळे, कोंडीभाऊ टाकळकर, किरण आहेर, मुकुंद आवटे, विजया शिंदे, अमृता गुरुव, सोनाली सांडभोर, स्नेहल राक्षे, संपदा सांडभोर, प्रकाश वाडेकर उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालयाच्या एनसीसीच्या कॅडेट्सनी मानवंदना दिली. हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाजवळील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद राजगुरू, भगतसिंग व सुखदेव यांना मान्यवरांनी मानवंदना दिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात अभिनेते विक्रम गोखले यांनी राजगुरू प्रतिष्ठानला सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी दर वर्षी सुमारे २१ हजारांची देणगी देण्याचे जाहीर केले. या वर्षीचा धनादेश प्रतिष्ठानकडे सुपूर्द केला. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनी दर वर्षी ५ हजारांची देणगी प्रतिष्ठानच्या सामाजिक कामांसाठी देण्याचे जाहीर केले. दरम्यान, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जन्मभूमी असेलल्या वाड्यावरती सकाळी १० वाजता ध्वजारोहण गाडे यांच्या हस्ते केले.
सुनील गाडे म्हणाले, ‘‘शासनाकडे मागील वर्षी ७८ कोटी रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे. तसा पाठपुरावा सुरू आहे. शासनस्तरावर मान्यता मिळल्यानंतर तातडीने येथील जागा संपादन करून सुसज्ज ग्रंथालय, रस्ते तसेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे भव्यदिव्य स्मारक बांधले जाईल.’’ या वेळी स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सुशील मांजरे, बाबाजी काळे, किरण मांजरे, राहुल गोरे, पंचशील फलके, सचिन भंडारी, शैलेश रावळ, संदीप वाळुंज, योगेश गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)