शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

कारवाईत प्रामाणिक कर्मचारीही घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:39 IST

गैरहजेरीच्या कारणास्तव कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये काही प्रामाणिक चालकांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : गैरहजेरीच्या कारणास्तव कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये काही प्रामाणिक चालकांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) दहमहा २२ दिवसांच्या हजेरीच्या निकषापेक्षा जास्त दिवस हजेरी असूनही काहींवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.‘पीएमपी’ प्रशासनाने काही दिवसांपुर्वी १५८ बदली हंगामी रोजंदारी चालकांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. सातत्याने गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी प्रशासनाने दरमहा नियमानुसार २२ दिवस हजेरीचा निकष निश्चित केला आहे. त्यानुसार आॅगस्ट ते डिसेंबर २०१७ या चार महिन्यांत त्यापेक्षा कमी दिवस हजेरी असलेल्या कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईमध्ये २२ दिवसांहून अधिक हजेरी असलेल्या चालकांनाही बडतर्फ करण्यात आल्याचे राष्ट्रवादी कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी सांगितले.चालकाच्या पगारपत्रानुसार त्याचे आॅगस्ट महिन्यात २३, सप्टेंबर २२, आॅक्टोबर २४, नोव्हेंबर ३०, डिसेंबर २५ असे पगारी दिवस भरले आहेत.एकही महिन्यात २२ दिवसांपेक्षा कमी हजेरी नाही. त्यामुळे प्रशासनाने केलेली कारवाई चुकीची अशा प्रकारे आणखी काही चालकही भरडले गेले आहेत, असे नलावडे यांनी सांगितले. तसेच सेवानियम ७५(५) मधील तरतुदीनुसार संबंधित सेवकांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना बचावाची संधी देणे आवश्यक आहे. पण १५८ चालकांना ही संधी न देता सेवा संपुष्टात आणली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणीही नलावडे यांनी केली आहे.स्वारगेट आगारातील एका चालकालाही प्रत्यक्ष कामावर हजर असल्याचे प्रमाण असमानाधानकारक असल्याबद्दल त्याची सेवा संपुष्टात करण्यात आली आहे. आॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीमधील गैरहजर दिवस २४ व बिनपगारी ४ आहेत तसेच नियमानुसार दरमहा २२ दिवस इतके हजेरीचे दिवस असताना ते कमी असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे