घरकुल पुरवणी लेख : इंटिरियर डेकोरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:48+5:302021-04-16T04:11:48+5:30

डिझाई साठी व्यावसायिक इंटिरियर डिझाईनर किंवा आर्किटेक्ट नेमणे हे तुमच्याच फायद्याचे असते. बरेच आर्किटेक्ट हे निष्णात इंटिरियर डिझाईनरसुद्धा असतात. ...

Home Supplementary Articles: Interior Decoration | घरकुल पुरवणी लेख : इंटिरियर डेकोरेशन

घरकुल पुरवणी लेख : इंटिरियर डेकोरेशन

googlenewsNext

डिझाई साठी व्यावसायिक इंटिरियर डिझाईनर किंवा आर्किटेक्ट नेमणे हे तुमच्याच फायद्याचे असते. बरेच आर्किटेक्ट हे निष्णात इंटिरियर डिझाईनरसुद्धा असतात.

या प्रक्रियेचं पहिलं पाऊल म्हणजे तुमच्या घरातल्या प्रत्येकाच्या गरजा आणि खास पसंतीच्या गोष्टी यांची डिझाईनर बरोबर चर्चा करणे. इथेच तुमच्या घराच्या डिझाईनची दिशा ठरते. घराची आतली नेमकी मापं डिझाईनर घेतो आणि तुमच्याबरोबर झालेल्या चर्चेअनुसार आराखडा म्हणजेच प्लॅन तयार करतो.

काही महत्त्वाचे मुद्दे ज्यांच्याकडे लक्ष द्यावे ते असे.

जर तुम्ही घराच्या आतील स्पेसेस (म्हणजेच भिंती) बदलत असाल तर बिल्डर, आर्किटेक्ट आणि सोसायटीची परवानगी घेणे आवश्यक आहे. कॉलम बीमला कधीही हात लागता काम नये. प्रवेशद्वारातून आत आल्यावर लॉबीसारखी (किमान छोटी) जागा असावी. फर्निचर अशा पद्धतीने ठेवावे की रूममधला वावर हा अगदी सोपा असावा. चालण्यासाठी योग्य मापाचा पॅसेज (रास्ता) असावा. घरात असलेले सर्व लिव्हिंगमध्ये बसू शकतील किमान एवढं सीटिंग आणि डायनिंग असावं. जर जागा अपुरी असेल तर स्मार्ट पद्धतीने स्पेस सेव्हिंग फर्निचरचा उपयोग करावा. किचन पूर्ण प्रायव्हेट हवं आहे की मॉडर्न पद्धतीचे ओपन किचन चालू शकेल हे चर्चा करून ठरवा. गॅस स्टोव्ह, फ्रीज आणि सिंक हे एकमेकांपासून दोन तीन पावलांच्या अंतरावर असावे.

टॉयलेटमध्ये सुद्धा वावर सोपा असावा. वॉश एरिया हा ड्राय बाल्कनीच्या जवळ असावा. बेडरूम्स हे आदर्शपणे लॉबी किंवा पॅसेजमधून असावेत. बेडच्या दोन्ही बाजूला उतरण्यास जागा असेल तर उत्तम.

जर तुम्ही घरात राहता-सर्व्हंट ठेवत असाल तर त्याला वेगळी रूम टॉयलेट, आणि वेगळा एन्ट्री दरवाजा असावा.

तुमच्या जीवन पद्धतीला चालेल आणि घरच्या सर्वांना आरामदायक वाटेल असाच लेआउट करून घ्यावा.

एकदा लेआऊट ठरला की मग फर्निचरचे लूक ठरवता येतं. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या थीम (एथनिक, मॉडर्न, कंटेम्पररी वगैरे) मधून एक ठरवून त्याप्रमाणे डिझाईन निश्चित करू शकता. फर्निचरचा आकार आणि रंग ठरवताना भिंती आणि पडदे यांचेही रंग यांचा विचार करावा. २ पेक्षा जास्त रंग टाळावे. एकमेकास कॉम्पलिमेन्ट करणारे रंग वापरावे.

फॉल्स सिलिंगने इंटिरियरचा लूक आकर्षक होतो. लाइटिंग हा अजिबात दुर्लक्ष ना करण्याचा विषय आहे. व्यवस्थित वापरलेले लाईट्स तुमच्या इंटेरिअर्सचे लूक १००% सुधारतात. इलेक्ट्रिकल्स आणि स्वीचेस चांगल्या ब्रँडचेच वापरावे. होम ऑटोमेशनमुळे वापराची सोय आणि सेक्युरिटी दोन्ही जमून जातात.

फर्निचर, लाईट आणि हार्डवेअरचे मटेरियल हे उत्तम प्रतिचे वापरल्यास लवकर खराब होत नाही आणि पर्यायाने दीर्घकाळात पैसे वाचतात. बाजारात नवीन टेक्नाॅलॉजी, नवीन मटेरिअल्स यांची माहिती घेऊन मगच पुढचे पाऊल टाकावे.

या सर्व बाबींचा विचार करून ठेवा म्हणजे जेव्हा डिझाईनर तुम्हाला डिझाईन प्रेझेंट करतो तेव्हा तुम्ही नेमके प्रश्न विचारू शकता. फॉर्म फॉलोज फंक्शन हे लक्षात असू द्या, म्हणजेच आकार हा कार्यामुळे ठरतो. तुम्हाला तुमच्या घराच्या सुशोभीकरणासाठी शुभेच्छा!

- आर्किटेक्ट सागर बिद्री

Web Title: Home Supplementary Articles: Interior Decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.