नारायण राणे रुग्णालयातून घरी

By Admin | Updated: May 6, 2014 01:09 IST2014-05-06T01:07:24+5:302014-05-06T01:09:40+5:30

मुंबई : प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. जुहू येथील निवासस्थानी ते सध्या विश्रांती घेत असल्याची माहिती डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली आहे.

Home from Narayana Rane Hospital | नारायण राणे रुग्णालयातून घरी

नारायण राणे रुग्णालयातून घरी

मुंबई : प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. जुहू येथील निवासस्थानी ते सध्या विश्रांती घेत असल्याची माहिती डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली आहे.
उद्योगमंत्री राणे २८ एप्रिलला लंडन येथे कुटंुबीयांसमवेत रवाना झाले होते. मात्र, तेथे मधुमेह व लघवीचा त्रास जाणवू लागल्याने ३० एप्रिलला ते मुंबईतील ब्रीच कॅँडी रुग्णालयात दाखल झाले. तेथील डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. त्यामुळे सोमवारी सकाळी राणे यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. राणे यांच्या प्रकृतीबद्दल सिंधुदुर्गात अफवा पसरविल्या जात असून, त्यावर कोणीही विश्वास ठेवूनये, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Home from Narayana Rane Hospital